लाचखोर ग्राम महसूल अधिकारी अडकली जाळ्यात; वीटभट्टी परवानासाठी घेतली लाच

By अंकुश गुंडावार | Updated: March 24, 2026 12:47 IST2026-03-24T12:46:54+5:302026-03-24T12:47:32+5:30

Gondia : वीटभट्टीचा परवाना देण्यासाठी लाचेची मागणी करून १० हजार रुपये स्वीकारताना ग्राम महसूल अधिकारी महिलेस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

Bribing village revenue officer caught in the net; Bribe taken for brick kiln license | लाचखोर ग्राम महसूल अधिकारी अडकली जाळ्यात; वीटभट्टी परवानासाठी घेतली लाच

Bribing village revenue officer caught in the net; Bribe taken for brick kiln license

गोंदिया : वीटभट्टीचा परवाना देण्यासाठी लाचेची मागणी करून १० हजार रुपये स्वीकारताना ग्राम महसूल अधिकारी महिलेस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम निमगाव येथे सोमवारी (दि. २३) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. गायत्री बोरकर असे लाचखोर ग्राम महसूल अधिकारी महिलेचे नाव आहे.

तक्रारदार (रा. अरततोंडी) यांचा वीटभट्टी व्यवसाय असून, गायत्री बोरकर हिने रविवारी (दि. २२) त्यांच्या भट्टीवर जाऊन परवाना नसल्याने अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावण्याची धमकी दिली. तसेच यापासून वाचण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केली. यावर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे पथकाने सोमवारी (दि. २३) पडताळणी करून गायत्री बोरकर हिला तिच्या घरासमोरच १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी अर्जुनी-मोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची कारवाई वृत्त देईपर्यंत सुरू होती.

Web Title : घूसखोरी: ग्राम राजस्व अधिकारी ईंट भट्ठे की अनुमति के लिए घूस लेते गिरफ्तार

Web Summary : गोंदिया: निमगांव में एक ग्राम राजस्व अधिकारी को ईंट भट्ठे की अनुमति के लिए ₹10,000 की घूस लेते गिरफ्तार किया गया। अनुमति न होने पर उसने ₹2.5 लाख जुर्माने की धमकी दी और घूस मांगी। भ्रष्टाचार निरोधक ब्यूरो ने उसे रंगे हाथों पकड़ा।

Web Title : Bribery: Village Revenue Officer Arrested Accepting Bribe for Brick Kiln Permit

Web Summary : Gondia: A village revenue officer was arrested accepting a ₹10,000 bribe for a brick kiln permit in Nimgaon. She threatened a ₹2.5 lakh fine for lacking permit, demanding the bribe. Anti-Corruption Bureau caught her red-handed.