देशी कट्ट्यासह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 05:00 IST2021-03-29T05:00:00+5:302021-03-29T05:00:15+5:30

‘लोकमत’ने देशी कट्ट्यांच्या विक्रीसंदर्भात वृत्त प्रकाशित करताच पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी अवैध धंदे, तसेच अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे  निरीक्षक बबन आव्हाड यांनी या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करीत आपल्या कर्मचाऱ्यांना कारवाई करण्यासाठी रवाना केले.

Both arrested along with Desi Katta | देशी कट्ट्यासह दोघांना अटक

देशी कट्ट्यासह दोघांना अटक

ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांचा आदेश : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :  शहरात देशी कट्ट्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून, पोलिसांनी कारवाई करण्याची गरज असल्याचे खळबळजनक वृत्त ‘लोकमत’ने रविवारी (दि.२८) प्रकाशित केले. या वृत्ताची दखल पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने घेऊन देशी कट्टा विक्री करणाऱ्या व बाळगणाऱ्यांविरोधात त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले. या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देशी कट्ट्यासह दोघांना अटक केली आहे. या प्रकरणात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
‘लोकमत’ने देशी कट्ट्यांच्या विक्रीसंदर्भात वृत्त प्रकाशित करताच पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी अवैध धंदे, तसेच अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे  निरीक्षक बबन आव्हाड यांनी या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करीत आपल्या कर्मचाऱ्यांना कारवाई करण्यासाठी रवाना केले. यात रविवारी (दि.२८) स्थानिक गुन्हे शाखेतील हवालदार भुवनलाल देशमुख, अर्जुन कावळे, पोलीस नायक कोडापे व विनोद गौतम हे पोलीस वाहनाने (क्रमांक एमएच ३५-डी ५६५) शहर ठाण्याच्या हद्दीत होळी बंदोबस्त, गुन्हेगार शोध व पेट्रोलिंग करीत होते. अशात त्यांना मपूर उपाध्याय विनापरवाना पिस्टल बाळगून असून, सध्या लालपहाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पिस्टल विक्री करण्याच्या उद्देशाने उभा आहे, अशी माहिती मिळाली. यावर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक आव्हाड यांना मााहिती देऊन ते  निघाले व सापळा रचून  मपूर ऊर्फ आऊ उमेश उपाध्याय (१९, रा. मुर्री लालपहाडी) याला ताब्यात घेतले. 
 पिस्टलसंदर्भात त्याला विचारणा केली असता त्याने मयूर प्रेमलाल गजभिये (रा.कुंभारेनगर)  याला दिल्याचे व ती पिस्टल धम्मदीप गजभिये (रा. कुंभारेनगर) याच्या मालकीची असल्याचे सांगितले. यावरून त्याला ताब्यात घेऊन जात असताना रस्त्याने जाणारा मयूर प्रेमलाल गजभिये दिसला असता त्याला पकडून तपासणी केल्यावर त्याच्या कंबरेला पॅन्टमध्ये मागच्या बाजूला देशी पिस्तूल आढळली. ती पिस्टल ३५ हजार रुपये किमतीची आहे.   या प्रकरणात मयूूर गजभिये व मपूर उपाध्याय लालपहाडी यांना अटक करण्यात आली आहे, तर  आरोपी धम्मदीप गजभिये फरार झाला आहे. शहर पोलिसांत पोलीस हवालदार राजेंद्र मिश्रा यांच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Both arrested along with Desi Katta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.