शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

नगर परिषदेत पुन्हा भाजपराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 00:07 IST

गोंदिया परिवर्तन आघाडीच्या गट नेत्यावर अवलंबून असलेली नगर परिषद सभापतिपदाची निवडणूक अखेर भारतीय जनता पक्षाच्या मर्जीप्रमाणेच पार पडली. न्यायालयाच्या निर्णयाने आघाडीचे गट नेता राजकुमार कुथे हेच ठरले व त्यांनीच दोन नावे सुचविल्याने निवडणुकीचे अवघे चित्रच पालटले.

ठळक मुद्देआघाडीचे गटनेते कुथेच : गदारोळात पार पडली निवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया परिवर्तन आघाडीच्या गट नेत्यावर अवलंबून असलेली नगर परिषद सभापतिपदाची निवडणूक अखेर भारतीय जनता पक्षाच्या मर्जीप्रमाणेच पार पडली. न्यायालयाच्या निर्णयाने आघाडीचे गट नेता राजकुमार कुथे हेच ठरले व त्यांनीच दोन नावे सुचविल्याने निवडणुकीचे अवघे चित्रच पालटले. गदारोळात निवडणूक पार पडली असली तरीही नगर परिषदेत पुन्हा भाजपराज आला.नगर परिषद सभापतींचा कार्यकाळ संपल्याने शनिवारी (दि.१६) सभापतीपदासाठी निवडणूक घेण्यात आली. मागील वर्षी झालेल्या लहानशा चुकीमुळे भाजपला सर्वात महत्वाचे बांधकाम समिती सभापतीपद गमवावे लागले होते. त्यामुळे यंदा भाजप अत्यंत सावधरित्या नजरा लावून होती. मात्र गोंदिया परिवर्तन आघाडी, कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस एकत्र येवून समिकरण बिघडविण्याच्या प्रयत्न होते व तसेच झाले. मात्र आघाडी गटनेता पद अखेर भाजपच्या समर्थनात असलेले कुथे यांच्याकडे गेल्याने आघाडीचे गणीत फिस्कटल्याचे दिसले.निवडणुकीत गट नेता म्हणून कुथे यांनी त्यांच्या दोन सदस्यांची नावे दिल्याने सर्वच पदे भाजप तसेच आघाडीतील अपक्ष सदस्य सचिन शेंडे यांना मिळाले.तर ११ सदस्यीय स्थायी समितीत नगराध्यक्ष अशोक इंगळे, उपाध्यक्ष शिव शर्मा, पदसिद्ध सदस्य धर्मेश अग्रवाल, मैसमी परिहार, नितू बिरीया, सचिन शेंडे, वर्षा खरोले असतानाच भाजपने घनशाम पानतवने, कॉँग्रेसने क्रांती जायस्वाल यांना तर आघाडीकडून कुथे यांनी नेहा नायक यांना पाठविले. एकंदर नगर परिषदेत सर्व काही भाजपच्या मर्जीप्रमाणे झाल्याने नगर परिषदेत पुन्हा भाजपराज आला.सभागृहातच विरोधकांचे धरणे आंदोलननिवडणूक दरम्यान आघाडीतील गट नेता कु थे तसेच बसपच्या सदस्यांनी निवडलेल्या गट नेता ललीता यादव यांनी व्हीप जारी केले होते. तसेच सभागृहात कोण नावे निर्देशित करणार या विषयाला घेऊन चांगलाच गदारोळ झाला. यावर पिठासीन अधिकाऱ्यांनी सद्य स्थितीत आघाडीचे गट नेता म्हणून कुथे यांनाच नावे निर्देशित करण्याचा अधिकार असल्याचे सांगीतले. यावर मात्र विरोधकांकडून विरोध करण्यात आला. तसेच निवडणूक प्रक्रीयेचा विरोध करीत नारेबाजी करीत सदस्य धरण्यावर बसले होते. एवढेच नव्हे तर, बसपच्या ५ सदस्यांनी निवडणुकीत मतदानही केले नाही.शेंडे यांची लागली लॉटरीनिवडणुकीत बांधकाम समितीसाठी भाजपकडून धर्मेश अग्रवाल तर आघाडीकडून लोकेश यादव, शिक्षण समितीसाठी भाजपकडून मौसमी परिहार तर कॉंग्रेसकडून निर्मला मिश्रा, पाणी पुरवठा समितीसाठी भाजपक डून नितू बिरीया तर कॉँग्रेकडून दिपीका रूसे, नियोजन समितीसाठी आघाडीतील अपक्ष सदस्य सचिन शेंडे तर राष्ट्रवादीकडून विनीत सहारे तसेच भाजपक डून विवेक मिश्रा तर महिला व बाल कल्याण समितीसाठी भाजपकडून वर्षा खरोले तर आघाडीकडून ज्योत्सना मेश्राम यांची नावे होती. यात ७ -५ मतदानाने धर्मेश अग्रवाल, मौसमी परिहार, नितू बिरीया व वर्षा खरोले हे जिंकले. तर नियोजन समितीत सचिन शेंडे भाजपच्या समर्थनात असल्याने भाजपकडून विवेक मिश्रा यानी आपले नाव मागे घेतले. अशात शेंडे जिंकले असून नियोजन समिती सभापतीपदाची माळ त्यांच्या गळ््यात पडली.

टॅग्स :ElectionनिवडणूकBJPभाजपा