भांडणातून केला भूमेश्वरचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 05:00 AM2020-07-11T05:00:00+5:302020-07-11T05:00:40+5:30

याप्रकरणी मृत भूमेश्वरचा चुलत भाऊ अनिल केशव चौधरी (३५,रा. काटी) याच्या तक्रारीवरून रावणवाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र भूमेश्वरचा मृत्यू संशयास्पद वाटत असल्याने ठाणेदार सचिन वांगळे यांनी तपासाची चक्रे फिरवून अकस्मात मृत्यू नसून हा खून असल्याचे उघडकीस आणले.

Bhumeshwar was killed in a quarrel | भांडणातून केला भूमेश्वरचा खून

भांडणातून केला भूमेश्वरचा खून

Next
ठळक मुद्दे२४ तासांच्या आत उलगडा : आरोपीला केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आपसांतील भांडणातून भूमेश्वर रघू चौधरी (३६,रा.काटी) याचा खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रावणवाडी पोलिसांनी २४ तासांच्या आत या प्रकरणाचा उलगडा केला असून आरोपीला अटक केली आहे.
ग्राम काटी येथील भूमेश्वर चौधरी हा सोमवारी (दि.६) सकाळी १० वाजता घरून निघाला होता. तर बुधवारी (दि.८) सकाळी ७ वाजतादरम्यान त्याचा मृतदेह बाजार चौकातील तुटलेल्या हॉटेलात कुजलेल्या अवस्थेत मिळून आला होता.
याप्रकरणी मृत भूमेश्वरचा चुलत भाऊ अनिल केशव चौधरी (३५,रा. काटी) याच्या तक्रारीवरून रावणवाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र भूमेश्वरचा मृत्यू संशयास्पद वाटत असल्याने ठाणेदार सचिन वांगळे यांनी तपासाची चक्रे फिरवून अकस्मात मृत्यू नसून हा खून असल्याचे उघडकीस आणले.
या प्रकरणात त्यांनी आरोपी अनिल राधेलाल भगत (४५) याला गुरूवारी (दि.९) सायंकाळी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता अनिलने सोमवारी (दि.६) भूमेश्वर सोबत भांडण करून लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यावर मारून खून केल्याचे स्पष्ट झाले.
यासंदर्भात पोलिसांनी भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. तर मृताचा मोबाईल आरोपीच्या दुकानातून जप्त करण्यात आला आहे.
 
Web Title: Bhumeshwar was killed in a quarrel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून