शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Top Marathi News LIVE Updates: 'निवडणुका संपताच वसुली सुरू झालीये', दरवाढ होताच विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले
3
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
4
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
5
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
6
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
7
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
8
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
9
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
10
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
11
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
12
पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
13
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
14
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
15
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
16
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
17
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
18
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
19
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
20
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाचा शेकडो युवक घेताहेत लाभ

By admin | Updated: June 6, 2014 00:04 IST

सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपल्यालाही नोकरी मिळावी या उद्देशाने ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार मुले, मुली विविध प्रकारे परिश्रम घेत असतात. परंतू अनेकदा त्यांचा टिकाव लागत नाही.

अर्जुनी/मोरगाव : सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपल्यालाही नोकरी मिळावी या उद्देशाने ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार मुले, मुली विविध प्रकारे परिश्रम घेत असतात. परंतू अनेकदा त्यांचा टिकाव लागत नाही. मात्र पोलीस भरतीमधील शारीरिक क्षमता चाचणीत आपण नक्कीच उत्तीर्ण होऊ असा विश्‍वास आता शेकडो बेरोजगार तरुण-तरुणींना वाटत आहे.
या बेरोजगार युवकांसाठी अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्याच्या आवारात नि:शुल्क शारीरिक प्रशिक्षण दिले जात आहे. स्पर्धेत टिकून राहावे यासाठीचा अभ्यास तथा पोलीस व सेनेमध्ये नोकरी मिळण्यासाठी ते विविध कसरतीचे प्रशिक्षण घेत आहेत. ग्रामीण भागातील मुलामुलींना पोलीस किंवा सेनेमध्ये नोकरी मिळविण्यासाठी सन २00९ पासून पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाचा हा उपक्रम राबविला जात असून त्याचे आता फलित होण्याची आशा निर्माण झाली आहे.
पोलीस हवालदार रमेश खंडाते हे पूर्वी १९९३-९४ या कालावधीत भंडारा-गोंदिया पोलीस मुख्यालयात कवायत निर्देशक म्हणून काम करीत होते. पोलीस विभागात नव्याने नियुक्त झालेल्या जवानांना सुध्दा त्यांनी प्रशिक्षण देण्याचे काम केले आहे. खंडाते हे सन २00९ ला अर्जुनी/मोरगाव पोलीस स्टेशनमध्ये बदलून आले. तेव्हापासून त्यांनी तालुक्यातील शेकडो बेरोजगार तरूण/तरूणींना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण मिळावे या सामाजिक भावनेतून त्यांनी प्रशिक्षण शिबीर सुरू करून शेकडो तरूण/तरुणींना प्रशिक्षित केले आहे. आज  त्यांच्या प्रशिक्षणामुळे तालुक्यातील ५0 ते ६0 मुले/मुली पोलीस विभाग, एसआरपी, सीआरपी, बीएसएफमध्ये नोकरीला लागले आहेत.
सध्या पोलीस भरतीची तयारी जोरात सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या प्रशिक्षणाला आणखीच महत्व आले आहे. आपल्या पोलीस स्टेशनची नियमित ड्युटी कार्य आटोपून खंडाते हे सामाजिक दायित्व ठेवून तालुक्यातील विद्यार्थ्यांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देत आहेत.
देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने यांनी अर्जुनी/मोरगावचे पोलीस स्टेशनमध्ये भेट दिली असता, पोलीस हवालदार रमेश खंडाते यांच्या या स्तुत्य उपक्रमाला शुभेच्छा देवून त्यांना प्रोत्साहित करून सदर विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण देण्याच्या सूचना करून आपणही स्वत: मार्गदर्शन केले. राजमाने तथा अर्जुनी/मोरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप भागवत यांचे मार्गदर्शनात खंडाते हे शेकडो मुला/मुलींना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देत आहेत.
या प्रशिक्षणात शारीरिक व्यायाम, दोन टप्यातील रनिंग, गोळा फेक, लॉग जम्प, पुलप्स अशा विविध कसरतीचे प्रशिक्षण दिले जाते. या कामासाठी पोलीस हवालदार दिवाकर शहारे सुध्दा त्यांना मदत करीत असल्याचे खंडाते यांनी सांगितले.  या कसरतीच्या प्रशिक्षणासोबतच प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेची तयारीसुध्दा पोलीस हवालदार अंबादास थोरात करून घेत आहे. हे सर्व सामाजिक उपक्रम आपण वरिष्ठांच्या प्रोत्साहनामुळे पूर्ण करीत असतो, असेही खंडाते यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)