नियमित कर्जफेड करणाऱ्या २४ हजार शेतकऱ्यांना लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 05:00 IST2020-03-08T05:00:00+5:302020-03-08T05:00:04+5:30
शासनाने दोन लाखापर्यंतचे शेतकºयांचे कर्जमाफ केले. पण नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कुठलीच सवलत दिली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. तर शासनाकडून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लवकरच योजना जाहीर केले जाईल असे सांगितले जात होते. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना नियमित कर्जफेड करणाºया शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहान अनुदान देण्याची घोषणा केली.

नियमित कर्जफेड करणाऱ्या २४ हजार शेतकऱ्यांना लाभ
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शुक्रवारी (दि.६) मांडलेल्या अर्थसंकल्पात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहान देण्याची घोषणा केली.याचा लाभ जिल्ह्यातील नियमित कर्जफेड करणाऱ्यां२४ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
महाविकास आघाडी सरकारने महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ केले. यासाठी जिल्ह्यातील २९ हजार ७६ शेतकरी पात्र ठरले. यापैकी २३ हजार १५६ शेतकºयांच्या बँक खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
शासनाने दोन लाखापर्यंतचे शेतकºयांचे कर्जमाफ केले. पण नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कुठलीच सवलत दिली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. तर शासनाकडून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लवकरच योजना जाहीर केले जाईल असे सांगितले जात होते. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना नियमित कर्जफेड करणाºया शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहान अनुदान देण्याची घोषणा केली. दोन लाख रुपयांच्यावरील कर्ज असणाऱ्यां शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ करुन उर्वरित रक्कम सदर शेतकऱ्याला भरावी लागेल अशी घोषणा केली. या अंतर्गत जिल्ह्यातील गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे २३ हजार ८६ आणि राष्ट्रीयकृत बँकाचे १ हजार ७८ शेतकरी पात्र ठरणार आहे. या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहानपर योजनेचा लाभ मिळणार आहे. तर दोन लाखांवरील कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या फार कमी आहे.
गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नियमित कर्जफेड करणाºया शेतकऱ्यांची यादी तयार केली असून आता लवकरच शासनाच्या संकेत स्थळावर अपलोड केली जाणार असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.