शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ वनरक्षकाच्या गळ्यात घंटा बांधा हो!

By admin | Updated: May 27, 2014 23:49 IST

काही कर्मचार्‍यांनी नोकरी करताना स्वत:च्या कामात बेईमानी करुन अवैध व्यवसाय करण्याचा प्रकार सडक/अर्जुनी तालुक्यात पहावयास मिळत आहे. वनविभाग सडक/अर्जुनी येथील एक

सडक/अर्जुनी : काही कर्मचार्‍यांनी नोकरी करताना स्वत:च्या कामात बेईमानी करुन अवैध व्यवसाय करण्याचा प्रकार सडक/अर्जुनी तालुक्यात पहावयास मिळत आहे. वनविभाग सडक/अर्जुनी येथील एक वनरक्षकाने स्वत:च्या जंगलातून दोन बिजा जातीचे मोठे झाड कापून विकले. आपल्या तालुक्यातील त्या कत्तल झालेल्या झाडाची भनक वरिष्ठ अधिकार्‍यांना लागू नये यासाठी त्या हुशार वनरक्षकाने ट्रॅक्टरने दुसर्‍या जिल्ह्यातील एका लहानशा खेडेगावातील मोठय़ा पाटलाच्या घरी नेऊन ठेवले. त्या लाकडाची विल्हेवाट लावल्याचे बोलले जात आहे.

शासकीय नोकरी करताना काही लोक

या प्रकरणातील वनरक्षक एवढय़ावरच थांबला नाही तर त्यांनी एक मजुराच्या हातून तो पुरावा नष्ट करण्यासाठी त्या खोडाला फोडून बाजूला केल्याची माहिती आहे. वनविभागाच्या नियमाप्रमाणे ज्याने कुणी चोरी करून पुरावा नष्ट करण्याचे कृत्य केले त्यांच्यावर पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल होवू शकतो, परंतु तेही काम केल्या गेले नाही. आपल्या कामात गब्बर झालेल्या कर्मचार्‍यांवर वरिष्ठांची नजर राहणे गरजेचे आहे.

असेच प्रकार सडक/अर्जुनी तालुक्यात होत राहील्यास एक दिवस कुंपणच शेत खाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रतिक्रिया उमटत आहे.

सामाजिक वनीकरण व शतकोटी वृक्ष लागवडीच्या माध्यमातून गावागावात जागा दिसेल तिथे झाडे लावल्याची योजना राबवून शासन कोट्यवधी रुपये खर्च करताना दिसत आहे. पण वनविभागाचेच कर्मचारी जर स्वत:च्या बिटातून मोठय़ा वृक्षांची विल्हेवाट लावत असतील तर या शासनाच्या योजनेला काय अर्थ राहीले हा ही संशोधनाचा विषय आहे. माती अडवा, पाणी जिरवा, झाडे लावा, झाडे जगवा व पर्यावरण वाचवा असा अनेक म्हणी आहेत. पण वनाचा रखवालदारच आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिक नसेल तर वनाचा र्‍हास झाल्याशिवाय राहणार नाही. तो वनरक्षक कोण? असा सूर उमटत आहे.

बिनधास्तपणे असे कृत्य करणारा हा वनरक्षक एका मोठय़ा नेत्यांच्या वरदहस्ताखाली जगत असल्याचे सांगण्यात येते.

या वृक्षतोड प्रकरणातील या व्यवसायिक वनरक्षकाच्या शोध मोहीमेत, जर तो वनरक्षक मिळाला तर त्या कर्मचार्‍यावर कारवाही करण्यासाठी कोणता मोठा अधिकार पुढाकार घेवून कुणाचे गळ्यात घंटा बांधले ते पुढील वनविभागाचे चौकशीत दिसून येईल. याची प्रतीक्षा नागरिकांना आहे. वरिष्ठांनी याप्रकरणी लक्ष घालावे अशीही अपेक्षा केली जात आहे.

(शहर प्रतिनिधी)

‘जो भी होगा देखा जायेगा’ याप्रमाणे वागताना दिसतात. सध्या बेकारी एवढी बोकाळली आहे, की बेरोजगारांना रोजगार मिळत नाही, तरी काही नोकरी करणार्‍यांना नोकरी टिकविता येत नाही, असे अनेक उदाहरण समोर येत आहे.‘पैसा कमाओ, पैसा बाटो’ असे करून पुढे-पुढे चालण्याची त्या वनरक्षकाची निती आहे. पण हे किती दिवस चालणार, याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.