वन्यप्राण्यांच्या गणनेसाठी वनविभाग झाला सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2016 01:38 IST2016-05-17T01:38:36+5:302016-05-17T01:38:36+5:30

नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्पात दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्यारात्री वन्यप्राण्यांची गणना केली जाते.

Be prepared for forest compilation | वन्यप्राण्यांच्या गणनेसाठी वनविभाग झाला सज्ज

वन्यप्राण्यांच्या गणनेसाठी वनविभाग झाला सज्ज

गोंदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्पात दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्यारात्री वन्यप्राण्यांची गणना केली जाते. यावर्षी २१ मे रोजी बुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर ही गणना होणार आहे. नवेगावबांध, न्यू नागझिरा, नागझिरा, कोका इत्यादी अभयारण्याच्या राखीव ५५६ चौकिमी वनांमध्ये गणनेसाठी वन्यजीव विभागाने २१६ मचाण तयार केल्या असून त्यावरून निरीक्षण करण्यात येणार आहे.
दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्यारात्री देशातील सर्वच राखीव वनक्षेत्रात विचरण करणाऱ्या वन्यजीवांच्या गणनेचे कार्य केले जाते. यावर्षी २१ मे रोजी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी संरक्षित वन्यक्षेत्र नागझिरा, न्यू नागझिरा, नवेगावबांध व कोका येथील ५५६ चौकिमीमध्ये पसरलेल्या वनक्षेत्रात वन्यप्राण्यांची गणना केली जाईल. त्यासाठी वन्यजीव विभागाद्वारे २१६ मचान बनविण्यात आले आहेत. या मचाणांवर बसून वन्यजीव प्रेमी व सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते २१ मे च्या सकाळी ८ वाजतापासून २२ मे च्या सकाळपर्यंत मचाणांजवळील जलस्रोतांवर येणाऱ्या वन्यजीवांची गणना करतील. त्यावेळी मचानांवर त्यांच्यासह वनकर्मचारीसुद्धा उपस्थित राहणार आहेत. २१६ पैकी २५ मचान स्थायी व १९१ मचाण अस्थायी रूपाने जलस्रोतांपासून ५० मीटर दूर अंतरावर तयार करण्यात आल्या आहेत. या कार्यासाठी जिल्ह्याशिवाय देशातील विविध भागात राहणारे वन्यजीवप्रेमींद्वारे आवेदन भरण्यात आले आहेत. मागील वर्षाच्या गणनेनुसार, या संरक्षित वनक्षेत्रात एकूण ११ हजार २७५ वनजीवांचे संचार आहे. यापैकी सहा वाघ, ८ बिबट, २४७ रानटी कुत्रे, १७२ अस्वल, दोन चांदी अस्वल, एक हजार २२४ रानटी म्हशी, एक हजार ४१० चितळ, ४४६ सांभर, ५९७ नीलगाय, २७ चौसिंगा, १५२ हरीण, एक हजार ४४४ रानडुकरे, २४० मोर, २९ मुंगूस, ४५४ लालतोंडी माकडे, आठ साही, १६ रानमांजरी, सहा रानकोंबडे आदींचा समावेश आहे.

पाण्याच्या अभावाने
होणार परिणाम
४वन्यजीव गणना राखीव वनांमध्ये नैसर्गिक व अस्थायीपणे बनविलेल्या जलस्रोतांजवळ मचानांवर जावून केली जाते. परंतु यावर्षी पावसाच्या कमतरतेमुळे वनातील अनेक नैसर्गिक जलस्रोतांमध्ये पाण्याचा अभाव असल्याने याचा परिणाम गणनेवर पडणार आहे. त्यामुळे यावर्षी वन विभागाद्वारे बनविण्यात आलेले जे जलस्रोत वाळले आहेत, अशा १० ठिकाणांवर मचाण बनविण्यात आले नाहीत.
४वन्यजीव विभागानुसार, जिल्ह्याच्या व्याघ्र राखीव प्रकल्पात एकूण सात वाघ व तीन छावे होते. परंतु काही दिवसांपूर्वी एका वाघिणीचा मृत्यू झाला. त्यामुळे आता सहा वाघ व तीन छावे बाकी आहेत. वन्यप्राण्यांच्या गणनेसाठी येणाऱ्या वन्यप्रेमींसाठी हे सहा वाघ व तीन छावे आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेत.

Web Title: Be prepared for forest compilation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.