बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 13:15 IST2025-10-15T13:11:38+5:302025-10-15T13:15:21+5:30
अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद बाबासाहेब पाटील यांनी सोडले आहे.

बाबासाहेब पाटलांनी पालकमंत्रिपद सोडलं, त्यांच्या जागी 'या' नेत्याला मिळाली जबाबदारी
शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानामुळे राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना झटका बसला आहे. पाटील यांना गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडावे लागले आहे. या पदाची जबाबदारी आता इंद्रनील नाईक यांच्या हाती देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरळी येथे झालेल्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत या बदलाची अधिकृत घोषणा केली. या निर्णयानंतर विदर्भातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली.
“माओवाद १०० टक्के संपणार, भूपतीची शरणागती मोठी गोष्ट”; CM फडणवीसांनी केले पोलिसांचे अभिनंदन
नागपूरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात प्रफुल्ल पटेल यांनी पालकमंत्र्यांवर टीका केली होती. यावेळी त्यांनी 'गोंदियाचे पालकमंत्री फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीलाच जिल्ह्यात येतात. बाकी वेळ ते दिसतच नाहीत', असे विधान पटेल यांनी केले. पटेल यांच्या या विधानानंतर या पालमंत्रिपदाध्ये बदल होणार या चर्चा सुरू होत्या.
हे कारण देत दिला राजीनामा
बाबासाहेब पाटील यांनी गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा प्रकृतीचे कारण देत दिला. काही दिवसापूर्वी त्यांच्या गुडघ्याचे ऑपरेशन झाले होते. पायाच्या त्रासामुळे लांबचा प्रवास करणे त्यांच्यासाठी अवघड होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आता गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे देण्यात आली आहे. नाईक हे स्वत: विदर्भातील असल्याने गोंदियाचे पालकमंत्री म्हणून अधिक चांगला न्याय देतील असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.