शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

आवटीसाहेब, खावटींना आवरा !

By admin | Updated: October 28, 2015 02:13 IST

सध्या पोलिस स्टेशनमध्ये नवीन-नवीन पोलीस व सोबत अधिकारी रुजू झाले. जुने गेले नवीन आले, हिशेब बरोबर झाला.

ओ.बी. डोंगरवार सध्या पोलिस स्टेशनमध्ये नवीन-नवीन पोलीस व सोबत अधिकारी रुजू झाले. जुने गेले नवीन आले, हिशेब बरोबर झाला. मात्र जुने जातेवेळी नवीन आलेल्यांना काहीतरी ‘खावटी’चे बोधामृत देऊन जातात. सध्या पोलिस स्टेशनमध्ये काही अधिकाऱ्यांचे खावटीचे प्रमाण वाढले असल्याची चर्चा आहे. काहीतरी चांगले करावे ही कल्पना मृतप्राय झाली. त्याजागी खावटीचे साम्राज्य आले. त्यामुळे नव्याने रुजू झालेल्या पोलिस निरीक्षकांनी पोलिसांवर करडी नजर ठेवणे गरजेचे आहे.नवीन आलेल्या पोलिस निरीक्षकांना तेवढा तालुक्याचा परिपूर्ण अभ्यास नाही. तो अभ्यास करण्याकरिता काही वेळ लागेल हे तेवढेच खरे आहे. त्याच अवधीत खावटींना आपला पराक्रम करण्याची नामी संधी मिळते तेव्हा संधीचे सोने करण्याकरिता कोणी वेळ वाया घालवणार नाही. ‘अभी नही तो कभी नही’ हे ब्रिदवाक्य समोर ठेऊन खावटी कर्मचारी आपली पदयात्रा सुरू करतात. तालुक्यात अवैध सट्टा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नगरात पट्टी घेतली जाते. मात्र हा व्यवसाय पड्यामागे सुरू आहे. गावागावात अवैध दारुची दुकाने मोठ्या थाटात सुरू आहेत. हे तेथील बिट जमादारांना माहिती आहे. मात्र कार्यरत पोलिस उपनिरीक्षकांना याची कल्पना असली तरी खावटीच्या नावावर फक्त कारवाई केली जाते.पाठीमागे काय चालले, कोण किती घेतो हे सर्व पड्यामागे असल्याने कुणालाच याची कल्पना नाही. मात्र जे सुरू आहे ते योग्य नाही. अगोदरच्या अधिकाऱ्यांनी खावटी केली नाही तो मुद्दा नाही. मात्र त्यांनी ‘आदमी देख के’ हा मुळमंत्र जोपासला होता. सध्या ‘कोई भी चलेगा’ पिचकून दाबून खावटी वसूली केली जाते. काही अधिकारी दुय्यम दर्जाचे आहेत ते स्वत:ला सर्वात मोठा अधिकारी समजून खावटीला उत्तेजना देतात. रात्री चालणाऱ्या चारचाकी वाहनांकडून किंमत ठरली आहे. अवैध दारु, अवैध सट्टा यांची किंमत ठरली आहे. तसेच ट्राफिकमध्ये सुद्धा व्यापक बोलबाला आहे. काही अधिकाऱ्यांनी दुसऱ्याच्या नावावर जमीन खरेदी केल्याची चर्चा आहे. जमीन खरेदी करण्यापर्यंत बाहेरुन आलेल्या काही दादांची हिंमत वाढली कशी हा मोठा संशोधनाचा विषय आहे. अशा खावटी अधिकाऱ्यांना काही दिवसांकरिता अतिसंवेदनशील भागात तैनाती केली तर खावटी बहादुरांना आळा बसू शकेल.मात्र प्रशासन तशी दखल घेत नाही. खाकी वर्दीचा धाक दाखवून खावटीचा कार्यक्रम चालवितात हे तेवढेच सत्य आहे. खाकीवर्दी अंगावर चढली म्हणजे मी मोठा शहाणा असे कोणी समजू नये, मात्र आमगाव पोलिस स्टेशन मध्ये ते चित्र दिसत नाही. आमचे कोणी काही वाकडे करु शकत नाही, हा विचार बाळगून काही लोक वागतात. हे तेवढेच सत्य आहे. मात्र ज्या घटना तालुक्यात घडल्या त्याचा शोध घेण्याचा किंवा छडा लागल्याचा पोलिसांकडून प्रयत्न झाला असला तरी हाताला यश मिळाले नाही. विर्शी येथील व्यापाऱ्याचा खून, शिवनी येथील शाळेतील मुलीचा रेल्वेने कटून मृत्यू खरोखर ही आत्महत्या आहे का? हे दोन्ही प्रकरण गुलदस्त्यात बंद आहे. अजुनपर्यंत दोन्ही प्रकरणांत आरोपी मोकाट आहेत. हेच प्रकरण घेऊन जनता रस्त्यावर उतरली असती तर तिगाव कांडाची पुनरावृत्ती होण्यास विलंब लागला नसता. आता जुने जाँबाज गेले तरी त्यांनी जातेवेळी तालुक्याची ओळखपरेड करुन दिली असेल हे तेवढेच खरे आहे. मात्र सध्या जे अधिकारी आहेत ते खावटी पलीकडे कोणताच विचार करताना दिसत नाही. त्यामुळे साहेब थोडे सावध व्हा व सर्वांची ओळख परेड करुन खावटींना आवरा, हीच आपणाकडून अपेक्षा आहे.