कोरोना व क्षयरोग वर जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 05:00 IST2020-08-20T05:00:00+5:302020-08-20T05:00:28+5:30
संपूर्ण जग कोरोनाविरूद्ध युद्ध लढत आहे. या आजारावर मात करण्यासाठी त्याची जास्तीत जास्त जनजागृती होणे गरजेचे आहे. यासाठी केंद्राचे प्रकल्प संचालक डॉ. सचिन चौधरी यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय तसेच येथील तालुका ग्रामीण रुग्णालय, नगर पंचायत कार्यालयातील भिंतीवर कोरोना व क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम विषयक पेंटीग तयार करण्यात आल्या आहेत.

कोरोना व क्षयरोग वर जनजागृती
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : दृष्टी बहुउद्देशिय विकास संस्थेतर्गत दृष्टी आरएनटीसिपी प्रकल्प व जिल्हा क्षयरोग केंद्र यांच्या संयुक्तवतीने क्षयरोग व कोरोनाबाबत पेंटिगच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. यांतर्गत भिंतीवर पेंटिग तयार करण्यात आल्या असतानाच पत्रकांचे वापर केले जात आहे.
संपूर्ण जग कोरोनाविरूद्ध युद्ध लढत आहे. या आजारावर मात करण्यासाठी त्याची जास्तीत जास्त जनजागृती होणे गरजेचे आहे. यासाठी केंद्राचे प्रकल्प संचालक डॉ. सचिन चौधरी यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय तसेच येथील तालुका ग्रामीण रुग्णालय, नगर पंचायत कार्यालयातील भिंतीवर कोरोना व क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम विषयक पेंटीग तयार करण्यात आल्या आहेत. यात कोरोना व क्षयरोग या आजारापासून आपला बचाव कशा प्रकारे करता येईल याबद्दल संदेश देण्यात आला आहे.
एवढेच नव्हे तर जिल्हा पीपीएम समन्वयक क्षयरोग विभागातील प्रज्ञा कांबळे, दृष्टी आरएनटिसीपी प्रकल्प समन्वयक विलास बघेले, गुणेश्वर बिसेन, दुर्गाप्रसाद उकरे, ललीता पटले व तालुक्यातील सर्व बाह्य संपर्क कर्मचारी पत्रकांच्या माध्यमातूनही जनजागृती करीत आहेत. यासाठी तालुक्यातील बाह्य संपर्क कर्मचारी आम्रपाली डोंगरे, शालीनी डोंगरे व इतर कर्मचारी सहकार्य करीत आहेत.