प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर टाळा
By Admin | Updated: January 24, 2015 22:56 IST2015-01-24T22:56:34+5:302015-01-24T22:56:34+5:30
राष्ट्रीय सण असलेल्या स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनी प्लास्टिक ध्वजांचा वापर केला जातो. सोहळ्यानंतर राष्ट्रध्वज ध्वज कुठेही पडलेले आढळतात. यातून देशाच्या राष्ट्रध्वजाचा अवमान होतो.

प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर टाळा
सन्मान राखा : रस्त्यांवर फेकू नका
गोंदिया : राष्ट्रीय सण असलेल्या स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनी प्लास्टिक ध्वजांचा वापर केला जातो. सोहळ्यानंतर राष्ट्रध्वज ध्वज कुठेही पडलेले आढळतात. यातून देशाच्या राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. यामुळे प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखला जावा यासाठी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी अमीत सैनी यांनी केले आहे.
शालेय विद्यार्थ्यांकडून तसेच नागरिकांकडूनही कागदाच्या व प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा स्वातंत्र्य व प्रजासत्ताक दिनी अथवा महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्र मांत वापर करण्यात येतो. मात्र, कार्यक्र म संपल्यानंतर प्लास्टिकचे वा कागदाचे राष्ट्रध्वज मैदानात रस्त्यावर तसेच कार्यक्र माच्या ठिकाणी इतरत्र पडलेले असतात. हे राष्ट्रध्वज पायदळी तुडविले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होते. ध्विजसहंतेच्या कलमानुसार प्रयोजनासाठी राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही तरतूद नाही. यामुळे कुणीही प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. प्लास्टिकचे अथवा कागदाचे खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज एका पिशवीत व्यविस्थत बांधून शिवून बंद करावेत. ते जिल्हाधिकारी अथवा तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करावेत. शाळा, महाविद्यालय, कार्यालय अथवा जनतेने राष्ट्रध्वजाचा सन्मान राखला जाईल, याची खबरदारी घ्यावी. राष्ट्रध्वजाचा अवमान व विटंबना होणे दंडनिय अपराध आहे, याची खबरदारी घ्यावी, असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.