शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

सरासरी ४६ वर्षे वयोगटातील उमेदवार सर्वाधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 06:00 IST

आमदार, खासदार व मंत्र्यांचे थाटबाट पाहण्यासारख्या आहे. मान-सन्मान व संपत्ती हे सर्व काही त्यांच्याजवळ असते व सर्वांनाच अशा शाही जीवनाची अपेक्षा असते. यासाठी काही कठीण परीक्षा देण्याची गरज नसून राजकारणाच्या रिंगणात भाग्य आजविणे गरजेचे आहे.यात एखाद्याचे नशिब फळफळले व खुर्ची हात आल्यास लॉटरीच लागते.

ठळक मुद्देअजय बडोले ठरले सर्वात तरूण : गोपालदास अग्रवाल ज्येष्ठ

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राजकारण्यांचा शाही थाट बघून आता कित्येकांना खुर्चीचा मोह आवारणे कठीण होत असल्याचे दिसत आहे. हेच कारण आहे की, कित्येक जण आपली नोकरी सोडून राजकारणात भाग्य आजवित असल्याचे दिसत आहे. ज्येष्ठांना लागलेले राजकारणाचे फॅड तरूणांनाही लागले असल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांचे वयोगट बघता सर्वाधिक उमेदवार सरासरी ४६ वर्षे वयोगटातील आहेत.आमदार, खासदार व मंत्र्यांचे थाटबाट पाहण्यासारख्या आहे. मान-सन्मान व संपत्ती हे सर्व काही त्यांच्याजवळ असते व सर्वांनाच अशा शाही जीवनाची अपेक्षा असते. यासाठी काही कठीण परीक्षा देण्याची गरज नसून राजकारणाच्या रिंगणात भाग्य आजविणे गरजेचे आहे.यात एखाद्याचे नशिब फळफळले व खुर्ची हात आल्यास लॉटरीच लागते. हेच कारण आहे की, पूर्वी राजक ारणापासून चार हात दूर राहा असे सांगणारे आता कमी झाले आहेत. यामुळेच आता तरूणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना खुर्चीची माया भुरळ घालत आहे.जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत रिंगणात असलेल्या उमेदवारांची यादी असेच काही सांगून जात आहे.कारण निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांचे वयोगट बघितल्यास सर्वाधिक उमेदवार सरासरी ४६ वर्षे वयोगटातील दिसून येत आहेत.विशेष म्हणजे, काही नवतरूणांनीही आपले भाग्य आजमाविण्यासाठी रिंगणात उडी घेतली आहे.यात अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघातून ३० वर्षांचे अपक्ष उमेदवार अजय बडोले सर्वात तरूण उमेदवार ठरले आहेत. तर गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे ६९ वर्षीय विद्यमान आमदार व भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गोपालदास अग्रवाल सर्वात जेष्ठ उमेदवार ठरले आहेत.बापू व चंद्रिकापुरेंची षष्ठ्यब्दीपूर्तीयंदा विधानसभा निवडणुकीत ४० ते ५० वर्षे वयोगटातील उमेदवारांची चांगलीच गर्दी दिसून येत आहे.असताना मात्र जेष्ठ उमेदवारांची संख्या कमी असली तरीही ते रिंगणात दिसत आहेत. ६९ वर्षीय आमदार गोपालदास अग्रवाल सर्वात ज्येष्ठ उमेदवार ठरले असतानाच आमगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व आता अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात असलेले रामरतनबापू राऊत तसेच अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार मनोहर चंद्रिकापुरे हे सुद्धा ज्येष्ठांच्या यादीत आहेत. बापू राऊत यांचे वय ६७ वर्षे असतानाच चंद्रिकापुरे हे ६४ वर्षांचे असून दोघांची षष्ठ्यब्दीपूर्ती झाली आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदिया