शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

आशा सेविकांचा उपविभागीय कार्यालयावर मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 06:00 IST

महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक संघटना (आयटक) च्या नेतृत्त्वात शहरातील पाल चौक येथून दुपारी १ वाजता मोर्चाला सुरूवात झाली. शहरातील मुख्य मार्गावरुन हा मूक मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला.शासनाने आशा सेविकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने याचा निषेध नोंदविण्यासाठी आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी तोंडाला काळा पट्या बांधल्या होत्या. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना देण्यात आले.

ठळक मुद्देउपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन : मागण्यां मंजूर करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विविध मागण्यांना घेऊन आशा सेविका आणि गटप्रवर्तकांचे मागील ३ सप्टेंबरपासून बेमुदत आंदोलन सुरू आहे.मात्र शासनाने त्यांच्या मागण्यांची अद्यापही दखल न घेतली नाही. त्यामुळे आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी सोमवारी (दि.१६) उपविभागीय कार्यालयावर मूक मोर्चा काढून निषेध नोंदविला.महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक संघटना (आयटक) च्या नेतृत्त्वात शहरातील पाल चौक येथून दुपारी १ वाजता मोर्चाला सुरूवात झाली. शहरातील मुख्य मार्गावरुन हा मूक मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला.शासनाने आशा सेविकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने याचा निषेध नोंदविण्यासाठी आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी तोंडाला काळा पट्या बांधल्या होत्या. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना देण्यात आले. या वेळी दिलेल्या निवेदनातून आशा सेविका व गटप्रवर्तकांना महागाई भत्ता देण्यात यावा, १३ सप्टेंबरचे परिपत्रक रद्द करण्यात यावे, आशांना १५ हजार आणि गटप्रवर्तकांना २५ हजार रुपये मानधन देण्यात यावे. वयाच्या ६० वर्षांनंतर सेवानिवृत्ती वेतन देण्यात यावे, सर्वोच्य न्यायालयाच्या निर्देशानुसार आशा व गटप्रवर्तकांना कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा. आशांना प्राथमिक आरोग्य केंद्राऐवजी तालुका वैद्यकीय कार्यालयातून कामाचा मोबदला देण्यात यावा, आशा व गटप्रवर्तकांना प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वतंत्र खोली उपलब्ध करुन देण्यात यावी. आशांना ज्या कामांचा मोबदला दिला जात नाही ती कामे देण्यात येऊ नये, परिसरात फिरण्यासाठी आशा सेविकांना दुचाकी वाहन देण्यात यावे, दर महिन्याचा १० तारखेच्या आत आशा व गटप्रर्वतकांना मानधन देण्यात यावे, आशा सेविका आणि गटप्रर्वतकांच्या समस्या आणि तक्रारी मार्गी लावण्यासाठी तक्रार निवारण समिती गठीत करण्यात यावी. आदी मागण्यांचा समावेश होता. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष रामचंद्र पाटील, सचिव शालू कुथे, सहसचिव करुणा गणविर यांचा समावेश होता. मोर्चात जिल्हाभरातील आशा सेविका आणि गटप्रर्वतक मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते.क्षुल्लक कारणातून महिलेला मारहाणगोंदिया : दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम रतनारा येथे पाण्याची मोटर बंद केली यावरून आरोपी क्रमांक १ याने फिर्यादी कल्पना प्रकाश गणवीर (३०,रा.रतनारा) यांच्या डोक्यावर सिमेंट चौकटच्या तुकड्याने मारून जखमी केले. तर आरोपी क्रमांक २ याने थापडबुक्यांनी मारहाण व अश्लील शिविगाळ केली. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजतादरम्यान घडलेल्या या घटनेत दवनीवाडा पोलिसांनी भादंविच्या कलम ३२४, ३२३, २९४, ३४ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतन