अर्जुनी-मोरगाव तालुका दहशतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 05:00 AM2020-05-23T05:00:00+5:302020-05-23T05:00:17+5:30

गडचिरोली जिल्ह्यातील ग्राम आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथील एक रु ग्ण तालुक्यातील ग्राम अरूणनगर येथील त्याच्या सासुरवाडीत येऊन गेल्याने गुरूवारपासून (दि.२१) अरुणनगर परिसर कंटोनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच गुरूवारी (दि.२१) रात्रीपर्यंत तालुक्यात सुमारे २५ नवीन रु ग्ण आढळून आल्याने संपूर्ण तालुकावासी दहशतीत जगत आहे.

Arjuni-Morgaon taluka in terror | अर्जुनी-मोरगाव तालुका दहशतीत

अर्जुनी-मोरगाव तालुका दहशतीत

googlenewsNext
ठळक मुद्देरूग्ण आढळल्याने भीती वाढली : करांडली व अरूणनगर कंटेन्मेंट झोनमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या सावटाखाली जगत आहे. त्यात गोंदिया जिल्ह्यात सुमारे ३० च्या घरात रूग्ण निघून आले आहेत. त्यातील सर्वाधिक रूग्ण तालुक्यातील असल्याने तालुकावासीयांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशात नागरिकांना घराबाहेर पडण्यास भीती वाटू लागली आहे.
मुंबईला रोजगारासाठी गेलेले सुमारे ५४ मजूर १५ मे रोजी ट्रकने जिल्ह्यातील आपापल्या स्वगावी पोहोचले. त्यापैकी ग्राम करांडली येथील एक मजूर कोरोनाबाधित निघाल्यामुळे करांडली परिसर कंटोनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला.
तसेच गडचिरोली जिल्ह्यातील ग्राम आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथील एक रु ग्ण तालुक्यातील ग्राम अरूणनगर येथील त्याच्या सासुरवाडीत येऊन गेल्याने गुरूवारपासून (दि.२१) अरुणनगर परिसर कंटोनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच गुरूवारी (दि.२१) रात्रीपर्यंत तालुक्यात सुमारे २५ नवीन रु ग्ण आढळून आल्याने संपूर्ण तालुकावासी दहशतीत जगत आहे. तालुक्यात रब्बी हंगामात धान पीक घेण्यात आले असून कापणी, बांधनी व चुरणी अशी शेतीची कामे सुरू आहेत.
काही दिवसांवर खरीप हंगामा असून पूर्वमशागत सुरू होणार आहे. अशा स्थितीत तालुक्यात बाधित रु ग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकरीवर्गात चिंतेची भर पडत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी बुधवारी (दि.२०) कंटोनमेंट झोन असलेल्या ग्राम करांडली व अरु णनगर येथे भेट देऊन पाहणी केली व आपत्कालीन समिती तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांना मार्गदर्शन करीत या काळात घ्यावयाची काळजी तसेच नागरिकांना सहकार्य करण्यास सांगीतले.

Web Title: Arjuni-Morgaon taluka in terror

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.