शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

केरोसिन विक्रेते व रेशन दुकानदारांना मानधन लागू करा

By admin | Updated: March 18, 2016 02:10 IST

केरोसिन विक्रेते व रेशन दुकानदारांना २० हजार रूपये मानधन लागू करण्यात यावे.

आंदोलनाचा पवित्र्यात : हॉकर्स-रिटेलर्स फेडरेशनचा इशारागोंदिया : केरोसिन विक्रेते व रेशन दुकानदारांना २० हजार रूपये मानधन लागू करण्यात यावे. तसेच केरोसिन विक्रेत्यांना गॅस एजंसी देण्यात यावे, त्यानंतरच केरोसिनवर अनुदानाचा विचार करण्यात यावे, अशी मागणी केरोसिन हॉकर्स-रिटेलर्स फेडरेशनने केली आहे.सदर फेडरेशनचे राज्य अध्यक्ष बाबुराव मेश्राम यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रानुसार, सदर योजनेंतर्गत केरोसिनवरील अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल व केरोसिनची खरेदी रक्कम शासनाच्या खजिन्यात जमा होईल. तेव्हा या कामाच्या मोबदल्यात केरोसिन विक्रेत्यांना मानधन देण्यात यावे. परवानाधारक प्रतिलिटर मागे केवळ २२ पैसे कमिशनवर ४० वर्षांपासून हमाली करीत आहेत. त्यामुळे त्यांना आता कमिशन नव्हे तर मानधन देण्यात यावे, अशी मागणी आहे.गोंदिया, भंडारा, अमरावती, लातुर, नांदेड, नंदूरबार या सहा जिल्ह्यांचा समावेश करून केरोसिनवरील अनुदान (आॅनलाईन) योजना सुरू करण्याचा निर्णय घेवून शासन परवानाधारकांवर अन्याय करीत आहे. काही केरोसिन विक्रेत्यांचा केवळ १०० लिटरचा मासिक कोटा आहे. त्यांना केवळ ११ रूपये कमिशन मिळते, मात्र त्यांना ३०० रूपयांचा रजिष्टर घ्यावा लागतो. तसेच रेशन दुकानदारांना प्रतिकिलोमागे केवळ ७० पैसे कमिशन मिळते. एपीएल कार्डधारकांचा रेशन बंद करण्यात आला आहे. अशा स्थितीत परवानाधारक आपल्या कुटुंबाचा पोलनपोषण करू शकत नाही. त्यासाठी केरोसिन विक्रेत व रेशन दुकानदार यांना २० हजार रूपये मानधन देण्यात यावे व कमी करण्यात आलेले केरोसिनचे मासिक कोटे वाढविण्यात यावे, अशी मागणी अनेकदा शासनाकडे करण्यात आली आहे.आधी परवानाधारकांना मानधन द्यावे, केरोसिनचे कोटे वाढविण्याची तरतूद करावी व केरोसिन विक्रेत्यांना गॅस एजंसी देण्यात यावे, त्यानंतरच केरोसिनवर आॅनलाईन अनुदानाचा विचार करण्यात यावा. तसेच या योजनेबाबत कागदपत्र मागविण्याची घाई करून परवानाधारकांना त्रस्त करण्यात येवू नये अन्यथा संघटनेद्वारे आझाद मैदान मुंबई येथे राज्यस्तरीय मोर्चा व आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. मागण्या पूर्ण करण्यात न आल्यास राज्यभरात १ एप्रिलपासून केरोसिन विक्रेते व रेशन दुकानदार बेमुदत आंदोलन करतील, अशी माहिती राज्य अध्यक्ष मेश्राम यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)