शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
5
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
6
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
7
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
8
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
10
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
11
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
12
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
13
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
14
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
15
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
16
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
17
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
18
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
19
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
20
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
Daily Top 2Weekly Top 5

मतदारसंघाच्या मागणीवरुन नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली असली तरी अद्यापही एकाही मतदारसंघातील उमेदवारीचे चित्र स्पष्ट झाले नाही. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील असंतुष्ठ आणि स्वत:ला पुढारी समजून घेणाऱ्यांनी मतदारसंघाच्या वाटपावरुन नाराजीचे नाट्य सुरू केले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही पक्षांनी अद्यापही मतदारसंघ आणि उमेदवारांच्या नावांची घोषणा केलेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली असली तरी अद्यापही एकाही मतदारसंघातील उमेदवारीचे चित्र स्पष्ट झाले नाही. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील असंतुष्ठ आणि स्वत:ला पुढारी समजून घेणाऱ्यांनी मतदारसंघाच्या वाटपावरुन नाराजीचे नाट्य सुरू केले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही पक्षांनी अद्यापही मतदारसंघ आणि उमेदवारांच्या नावांची घोषणा केलेली नाही. मात्र स्वत:ला पुढारी समजून घेणारे काही स्वंघोषीत पुढारी कार्यकर्त्यांना पुढे करुन विरोध करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे.गोंदिया जिल्ह्यातील एकूण चार विधानसभा मतदारसंघापैकी गोंदिया, आमगाव आणि अर्जुनी मोरगाव हे मतदारसंघ आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला होते. तर तिरोडा मतदारसंघ राष्ट्रावादीच्या वाट्याला होता. मात्र २०१४ निवडणूक या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढविली होती. त्यामुळे अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा, आमगाव विधानसभा मतदारसंघात राष्टÑवादी काँग्रेसला चांगले मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे यावेळी राष्टÑवादी काँग्रेसकडून अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा या मतदारसंघासाठी आग्रह धरला जात आहे. त्यात काही गैर नाही. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये यावरुन कुठलेच मतभेद नाहीत. कारण अद्याप या चारही मतदारसंघात जागा वाटपाचे सूत्र आणि उमेदवारीबाबत निर्णय झालेला नाही.त्यामुळे या विरोध किवा समर्थन करण्याचा प्रश्न येत नाही. मात्र स्वत:ला पुढारी समजणाऱ्यांनी यावरुन विरोध करण्यास सुरूवात केली आहे. यासाठी कार्यकर्त्यांचे नावे पुढे करुन स्वत: मात्र मागे राहण्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे.त्यामुळे यावर मतदारच तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करीत आहे. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच हे नाट्य कशाला असा सूर देखील आवळला जात आहे. दरम्यान यासर्व प्रकाराची या दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते काय दखल घेतात हे सुध्दा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.पाच वर्षांत कुठली कामगीरीविधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी सर्वच पक्षांतून इच्छूकांची भाऊ गर्दी वाढली आहे. जो तो उमेदवारीसाठी दावा करीत आहे. ज्या इच्छुकांची नावे पक्षातील कार्यकर्त्यांनी कधीच ऐकली नाही त्यांची सुध्दा नावे पुढे येत आहे. मागील पाच वर्षांत कधीही मतदारांच्या संर्पकात नसलेले आणि पक्षासाठी कुठलीही कामगीरी न करणारे सुध्दा उमेदवारीसाठी दावेदारी करीत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक