शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा दिवसात जमा होणार पीक नुकसानीची रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 06:00 IST

शेतकऱ्यांच्या खात्यात मदत झाली नव्हती. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार अर्जुनी मोरगाव यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन टाळाटाळ करणाऱ्या एचडीएफसी बँक शाखा केशोरीच्या बँक व्यवस्थापकावर कार्यवाही करण्याची मागणी केली. तसेच मदतीची रक्कम ४८ तासाच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाली नाही तर बँकेच्या शाखेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता.

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : अर्जुनी मोरगाव तालुक्यात सन २०१७ मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तत्कालीन शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून १ कोटी ६७ लाख २२ हजार ४४९ रुपयांची एचडीएफसी बँक शाखा केशोरीमार्फत जमा केली होती. परंतु २ वर्षाचा काळ लोटूनही सदर बँक शाखेनी शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत रक्कम जमा केली नव्हती.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मागणीला घेऊन तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर झालेली मदत त्वरित त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी.अशा आशयाचे निवेदन देऊन ४८ तासाची मुदत दिली होती. अन्यथा एचडीएफसी बँकेच्या शाखेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता.त्या इशाऱ्याची दखल घेत जाहीर झालेल्या नुकसानीची रक्कम येत्या १५ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची हमी नायब तहसीलदार गेडाम यांच्यासमोर बँक व्यवस्थापक सचिन लडके यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना लेखी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसानीची रक्कम पंधरा दिवसात जमा होणार आहे.सन २०१७ मध्ये तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण करुन तत्कालीन शासनाने नुकसानग्रस्तांना भरपाई म्हणून १ कोटी ६७ लाख २२ हजार ४४९ रुपयांची मदत जाहीर केली होती. परंतु एचडीएफसी बँक शाखा केशोरीच्या अनियमिततेमुळे २ वर्षांचा कालावधी लोटूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदत झाली नव्हती. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार अर्जुनी मोरगाव यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन टाळाटाळ करणाऱ्या एचडीएफसी बँक शाखा केशोरीच्या बँक व्यवस्थापकावर कार्यवाही करण्याची मागणी केली. तसेच मदतीची रक्कम ४८ तासाच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाली नाही तर बँकेच्या शाखेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत एचडीएफसी बँक शाखा केशोरीचे व्यवस्थापक सचिन लडके यांनी येत्या १५ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई रक्कम जमा करण्यात येईल असे लेखी हमीपत्र दिले.या वेळी शिवसेना जिल्हा सचिव संजय पवार, तालुका प्रमुख अजय पालीवाल, तालुका संघटक प्रमुख चेतन दहीकर, युवा सेना तालुका प्रमुख अभिजित मशिद, ज्ञानदेव कापगते, शुशील गहाणे, विनोद भजणे, कैलास चुन्ने, नाना शेंडे, सुधाकर बोरकर, गुलाब गोटेफोडे, राजू कोलाम, विनोद गहाणे, राजू गहाणे उपस्थित होते.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमा