डॉक्टरांकडून नेहमीच रेफर टू सालेकसाचा अवलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 05:00 IST2020-05-20T05:00:00+5:302020-05-20T05:00:40+5:30

प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार सध्या एका खोलीतून सुरू आहे. या ठिकाणी आवश्यक असल्यास दाखल करण्याची वेळ आली की त्या रूग्णाला भरती करून प्राथमिक औषधोपचार करण्याऐवजी सालेकसा येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविले जाते. तर कधी कधी थेट गोंदियाला जाण्यासाठी सांगितले जाते. अशावेळी अनेकदा दरेकसा परिसरातील गंभीर आजाराच्या रुग्णाला गोंदियाला नेताना तो दगावल्याच्या घटना सुध्दा घडल्या आहेत.

Always refer to Salekasa by doctors | डॉक्टरांकडून नेहमीच रेफर टू सालेकसाचा अवलंब

डॉक्टरांकडून नेहमीच रेफर टू सालेकसाचा अवलंब

ठळक मुद्देदरेकसाची आरोग्य सेवा ठप्प : रूग्णांना दाखल करण्याची सोय नाही, रेल्वे गेटमुळे समस्या

विजय मानकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसाचा संपुर्ण कारभार जमाकुडो येथील उपकेंद्रात सुरू आहे. या ठिकाणी सोयी सुविधेअभावी येथील डॉक्टर परिसरातील रूग्णांना नेहमी रेफर टू सालेकसाचा प्रयोग करतात. त्यामुळे अनेकदा गंभीर आजाराचा रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार सध्या एका खोलीतून सुरू आहे. या ठिकाणी आवश्यक असल्यास दाखल करण्याची वेळ आली की त्या रूग्णाला भरती करून प्राथमिक औषधोपचार करण्याऐवजी सालेकसा येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविले जाते. तर कधी कधी थेट गोंदियाला जाण्यासाठी सांगितले जाते. अशावेळी अनेकदा दरेकसा परिसरातील गंभीर आजाराच्या रुग्णाला गोंदियाला नेताना तो दगावल्याच्या घटना सुध्दा घडल्या आहेत. दरेकसा परिसर व या उपकेंद्रातील समाविष्ट गावे जंगलव्याप्त डोंगराळ आणि अतिदुर्गम भागातील आहेत. या गांवामध्ये राहणारे लोक मोलमजुरी करणारे किंवा वनोपज संकलन करून किंवा थोडीफार शेती व शेत मजुरी करून जीवन जगतात. आजारी पडले की ते जेमतेम प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचतात व आपल्याला मोफत आणि चांगला औषधोपचार मिळेल अशी अपेक्षा करतात. परंतु येथे येताच रूग्णांना त्वरीत भरती करून सलाईन, इंजेक्शन देत बेडची सोय व भरती करण्याऐवजी डॉक्टर थेट रेफर टू सालेकसाची पावती हातात देतात. गरीब आदिवासी लोक दरेकसा ते सालेकसापर्यंत १५ किलो मीटरचा प्रवास करून ग्रामीण रूग्णाला गाठण्यात अपयशी ठरतो. आरोग्य केंद्रात वाहन आहे परंतु तिचा उपयोग रूग्णांना नेण्यासाठी क्वचितच होतो. त्यात डिझेल भरण्याची वेळ रुग्णाच्या नातेवाईकावर येते. या शिवाय या भागात हिवतापाचे रूग्ण वर्षभर मिळतात. तसेच दूषित पाण्यामुळे उद्भवणारे रोग सुद्धा येथीला लोकांना नेहमी होतात. अशात त्यांना वेळेवर पुर्ण औषधोपचाराची नितांत गरज असते. परंतु अनेक सोयी अभावी येथे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही.

रेल्वे गेटमुळे होतो विलंब
दरेकसा हे गाव मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर असून या ठिकाणी असलेले रेल्वे स्थानका लगतच मुख्य मार्गावर रेल्वे गेट आहे. हा रेल्वे नेहमी बंद असतोे. या ठिकाणी अतिरिक्त प्लेटफॉर्म असल्याने एक्सप्रेस गाड्या पास करण्यासाठी तासनतास रेल्वे गेट बंद ठेवले जाते. अशा वेळी एखाद्या रुग्णालयात दाखल करण्याससाठी नेताना मोठी समस्या होते.
आवश्यक आरोग्य कर्मचाऱ्यांचा अभाव
रात्री बेरात्री एखादा रूग्ण या आरोग्य केंद्रात आला की या ठिकाणी आवश्यक आरोग्य कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे औषधोपचार मिळत नाही. सोयी अभावी अनेक कर्मचारी येथे बाहर गावावरुन ये-जा करतात.

Web Title: Always refer to Salekasa by doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.