शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 22:07 IST2019-06-04T22:07:08+5:302019-06-04T22:07:37+5:30
तालुक्यातील ग्राम चिखली येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ योजनेंतर्गत कृषी पंधरवाडा व खरीप हंगामापूर्व प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यात, शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : तालुक्यातील ग्राम चिखली येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ योजनेंतर्गत कृषी पंधरवाडा व खरीप हंगामापूर्व प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यात, शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी सरपंच छाया रंगारी होत्या. यावेळी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने, मंडळ कृषी अधिकारी मोहाडीकर, कृषी पर्यवेक्षक बावनकर, कृषी सहाय्यक आर.एम. वंजारी, कृषी मित्र कैलाश पटले प्रामुख्याने उपस्थित होते. ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ योजनेंतर्गत कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसिद्धी कार्यक्रमात शेतकºयांना विविध विषयांचे धडे देऊन त्यांना अधिक उत्पन्न कमी खर्चात कसे घेता येईल या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शेतकºयांना माती परीक्षणाचे महत्त्व, योग्य बियाण्याची निवड कशी करावी, बिज प्रक्रिया पद्धतीने वापर, ३३ कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्व, किटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी, निंबोळी गोळा करणे, संकरीत भाताखालील क्षेत्राची वाढ करणे, पेर भारत क्षेत्र वाढविणे, हलक्या आणि जड धानाखालील क्षेत्र वाढ करणे, पट्टा पद्धतीचा अवलंब करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कृषी सहायक वंजारी यांनी प्रास्ताविक मांडून बिज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. याप्रसंगी गावातील शेतकºयांनी मोठ्या संख्येत उपस्थित उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.