शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या आरक्षणावर गदा येऊ देणार नाही

By admin | Updated: February 2, 2015 23:06 IST

अलीकडे आपल्या जातीचा समावेश आदिवासींमध्ये करावा यासाठी काही लोक प्रयत्नशील आहेत. मात्र आदिवासींचे आरक्षण अबाधित ठेवून जर आरक्षण देण्यात येत असेल तर आमची कोणतीही हरकत नाही,

आदिवासी विकासमंत्र्यांची ग्वाही : कोयापुनेम गोंडवाना महाअधिवेशनाचे उद्घाटनविजय मानकर - सालेकसाअलीकडे आपल्या जातीचा समावेश आदिवासींमध्ये करावा यासाठी काही लोक प्रयत्नशील आहेत. मात्र आदिवासींचे आरक्षण अबाधित ठेवून जर आरक्षण देण्यात येत असेल तर आमची कोणतीही हरकत नाही, मात्र आदिवासींच्या आरक्षणातून इतर समाजाला वाटा दिला जात असेल तर हे आम्ही खपवून घेणार नाही आणि आदिवासींच्या आरक्षणावर गदा येऊ देणार नाही, अशी इशारावजा ग्वाही राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी दिली.तालुक्यातील कचारगड यात्रेनिमित्त आयोजित राष्ट्रीय कोयापुनेम गोंडवाना महाअधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते, तर विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री राजकुमार बडोले, आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, आ.संजय पुराम, जि.प.समाजकल्याण सभापती कुसन घासले, भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल मंचावर विराजमान होते.यावेळी पालकमंत्री बडोले यांनी दुर्गम भागाचा विकास करून आदिवासींना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे सांगितले. यावेळी इतर पाहुण्यांनीही मार्गदर्शन केले. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या जमाकुडो शासकीय आदिवासी आश्रमशाळा येथील विद्यार्थिनी अनिता मडावी हिचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक आभार कचारगड देवस्थान समितीचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद कोकोडे यांनी केले. पुढील तीन दिवस या परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.पाच वर्षात विविध सोयीसुविधाकचारगडच्या विकासासाठी पाच कोटी रुपयांचा निधी देऊन येत्या पाच वर्षात विविध विकास कामे करणार असल्याचे यावेळी पालकमंत्री बडोले यांनी यावेळी सांगितले.या कार्यक्रमाला विविध राज्यातील आदिवासी समाजबांधवांनी हजेरी लावली आहे. त्यामुळे पिवळा दुपट्टा आणि पिवळे शर्ट घातलेल्या श्रद्धाळू आदिवासींनी हा परिसर फुलून गेला आहे.विविध भागातून आलेल्या आदिवासी समाजबांधवांनी नृत्यकला सादर करून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले. काही प्रांतातील नृत्य पथक व वाद्य पथकातील सदस्य धनेगाव ते कचारगडदरम्यान गुफेकडे जाताना ठिकठिकाणी थांबून आपल्या कलेचे प्रदर्शन करताना दिसत होते.हा परिसर तीव्र नक्षलग्रस्त असल्यामुळे पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनात धनेगाव ते कचारगडपर्यंत टप्याटप्यावर पोलिसांचा आणि अतिरिक्त सुरक्षा जवानांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.