शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

आदिवासी समाजाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 8:54 PM

आदिवासी समाज शारीरिकदृष्ट्या मेहनती आहे. पण त्याला परिश्रमाचे योग्य मोल मिळत नाही. याकरिता आदिवासी समाजातील लोक जास्त प्रमाणावर उच्चशिक्षित झाले तर समाजामध्ये अनेक गुणवंत लोक तयार होतील.

ठळक मुद्देसहषराम कोरोटे : भागी येथील आदिवासी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : आदिवासी समाज शारीरिकदृष्ट्या मेहनती आहे. पण त्याला परिश्रमाचे योग्य मोल मिळत नाही. याकरिता आदिवासी समाजातील लोक जास्त प्रमाणावर उच्चशिक्षित झाले तर समाजामध्ये अनेक गुणवंत लोक तयार होतील. त्यामुळे समाजाची शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक परिस्थिती सुधारु शकते आणि तेव्हाच आपल्याला वाटेल की आपला समाज हा इतर समाजाच्या बरोबरीने विकासाच्या मुख्य प्रवाहात आला आहे. याकरिता आदिवासी समाजाला शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांनी केले.तालुक्यातील ग्राम भागी (चिचगड) येथे आदर्श आदिवासी सामूहिक विवाह समितीच्यावतीने रविवारी (दि.२१) आयोजित आदिवासी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. उद्घाटन आमदार संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. नामदेव किरसान यांच्या अध्यक्षतेत कोरेटे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.याप्रसंगी आदिवासी हलबा हलबी समाज संघटनेचे अध्यक्ष श्रावण राणा, आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरत दुधनाग, गडचिरोलीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर, मुख्य अभियंता प्रकाश घरत, जिल्हा परिषद सभापती लता दोनोडे, माजी सभापती देवराज वडगाये, आमगावचे गटशिक्षण अधिकारी वाय.सी.भोयर, सालेकसाचे माजी सभापती हिरालाल फाफनवाडे, बाजार समितीचे सभापती रमेश ताराम, भागीचे सरपंच धनराज कोरोंडे, आश्रमशाळा संचालक जितेंद्र नाईक प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी आमदार संजय पुराम यांनी, सामूहिक विवाह सोहळे काळाची गरज असून यात वर-वधू कुटुबीयांच्या वेळ व पैशांची बचत होते असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक विवाह समितीचे अध्यक्ष डॉ.विठ्ठल भोयर यांनी मांडले.संचालन सहायक शिक्षक भागवत भोयर व विलास राऊत यांनी केले. आभार सहायक शिक्षक नंदकिशोर भोयर यांनी मानले.या विवाह सोहळ्यासाठी समितीचे उपाध्यक्ष युवराज कोल्हारे, कृष्णा गवाड, नूरचंद नाईक, सचिव मधुकर कुरसुंगे, सहसचिव कोषाध्यक्ष ओमराज राऊत, सहकोषाध्यक्ष जयपाल कोसरे, संघटक शिवकुमार राऊत, प्रेमलाल कोरोंडे, सुरेश वारई, अरविंद कोरोंडे, राधेश्याम राऊत, शामराव गावड, अर्जुन भोयर, उमेश धानगाये यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले. या सोहळ््याला आदिवासी समाजातील प्रतिष्ठीत व्यक्ती आणि परिसरातील समाजातील बहुसंख्य महिला, पुरुष व युवक व वºहाडी प्रामुख्याने उपस्थित होते.१० जोडप्यांचे ‘शुभमंगल’आदिवासी सामूहिक विवाह समितीच्यावतीने ग्राम भागी येथे आयोजीत आदिवासी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ््यात १० जोडप्यांचे ‘शुभमंगल’ लावण्यात आले. सोहळ््यात समाजबांधव व वºहाडी व पाहुणे परिणयबद्ध नव जोडप्यांना आर्शिवाद देण्यासाठी उपस्थित होते.

टॅग्स :marriageलग्न