शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार सेवकावर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2017 00:49 IST

तालुक्यातील ग्राम बघोली येथील मनरेगा अंतर्गत पांदन रस्ता बांधकामावर नसलेल्या मजुरांची नावे दाखवून

उप मुकाअंनी दिले आदेश : बघोली येथे मनरेगाच्या कामात भ्रष्टाचार गोरेगाव : तालुक्यातील ग्राम बघोली येथील मनरेगा अंतर्गत पांदन रस्ता बांधकामावर नसलेल्या मजुरांची नावे दाखवून पैशाची उचल व मजुरांकडून पैशाची वसुली चौकशीत सिद्ध झाल्याने ग्रामरोजगार सेवकावर कारवाई करण्याचे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मनरेगा) यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहे. बघोली येथे मे २०१६ मध्ये पांदन रस्ता तयार करण्यात आला. शेतकऱ्यांची परवानगी न घेता ७ शेतकऱ्यांच्या शेतातून नवीनच पांदन रस्ता तयार करण्यात आला. यात कामावर न जाणाऱ्या अनेक मजुरांची नावे घालून शासनाच्या निधीची अफरातफर करण्यात आली. स्थानिक ग्रामरोजगार सेवक हिरालाल रामचंद्र बळगे यांनी अंगणवाडी मदतनिस प्रेमकला मेश्राम हिचे नाव कामावर दाखवून सात हजार ३१४ रुपये तिच्या खात्यात जमा होताच तिला ती रक्कम परत ही मागीतली. अशाच प्रकारे त्यांच्यासह इतर अनेकांनी रक्कम परत दिली. यावर शेतकऱ्यांनी काम बंद करण्यासाठी तक्रार दाखल केली होती. अधिकारी, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्यासहमतीने काम चालू असल्याचे लक्षात येताच शेतकरी रुपंद पटले यांनी तहसीलदार व जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली असता कार्यवाही शुन्य आहे म्हणून राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी उच्च अधिकाऱ्यांना पत्र देवून चौकशीचे आदेश दिले. पं.स. च्या विभागाकडून चौकशी करण्यात आली. पण चौकशी अहवालात दिरंगाईमुळे प्रकरण जवळ जवळ ११ महिने प्रलंबित राहिले. पण तक्रारकर्ते रुपचंद पटले व त्यांच्या साथीदारांनी हार न मानता शासनाच्या कामात झालेला भ्रष्टाचार खोदून काढला निधीचा दुरुपयोग शासनाच्या नजरेस आणून दिला. अखेर पं.स.च्या २९ आॅगस्टच्या अहवालानुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेल्या अंतीम चौकशीत ग्रामरोजगार सेवक बळगे यांनी अंगणवाडी मदतनीस पे्रमकला मेश्राम यांचे नाव मस्टरवर घेवून बँक खात्यात जमा के लेली रक्कम परतही घेतली असे बयानावरुन सिद्ध झाले. या अहवालानुसार ग्रामरोजगार सेवक बळगे यांनी आपल्या कामात कसूर केला व शासकीय निधीचा दुरूपयोग केला. सदर रक्कम ग्रामसेवक बळगे यांच्याकडून वसूल करुन मग्रारोहयोच्या पं.स. मधील शासकीय खात्यात जमा करावी व त्याचेविरुद्ध कार्यवाहीचे प्रस्ताव ग्रामसभेत ठेवून निर्णय घ्यावा व तसे संबंधित कार्यालयास कळवावे असे आदेश उप मुकाअ यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले. (शहर प्रतिनिधी)