शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

पलिकेतील राजकारण कर्मचाऱ्यांवर वरचढ

By admin | Updated: April 29, 2015 00:06 IST

राजकारणातल्या नव नवीन डेवपेचांमुळे नेहमी चर्चेत राहणारी नगरपरिषद आता प्रभारी नगरपरिषद अभियंत्यांच्या सुटीच्या अर्जावरून पुन्हा चर्चेत आली आहे.

अभियंत्यांवर दबाव : राजकारणाला कंटाळून दीर्घ रजेचा अर्जगोंदिया : राजकारणातल्या नव नवीन डेवपेचांमुळे नेहमी चर्चेत राहणारी नगरपरिषद आता प्रभारी नगरपरिषद अभियंत्यांच्या सुटीच्या अर्जावरून पुन्हा चर्चेत आली आहे. पालिकेतील राजकारणामुळे कामात त्रास होत असल्याच्या त्यांच्या अर्जामुळे पालिकेतील राजकारण कर्मचाऱ्यांवर वरचढ होत असल्याची पुष्टी होते. हेच कारण आहे की नगरपरिषद अभियंता दीर्घ सुटीवर गेले आहेत. गोंदियातले राजकारण म्हणताच भल्याभल्यांना घाम फुटतो. त्यात नगरप्रिषदेतील राजकारणाला तर काही तोडच नाही. सत्तेपासून तर कामांना घेऊन नगरपरिषदेत होत असलेल्या राजकारणाशी शहरवासी चांगलेच परिचीत आहेत. मात्र राजकारणातल्या या डावपेचांत येथील अधिकारी व कर्मचारी त्रस्त होत असल्याचे आता प्रभारी नगरपरिषद अभियंता डवलेंमुळे स्पष्ट झाले. तर राजकारणामुळेच पालिकेतील अधिकारी व कर्मचारी तसेच येथील कामांवरही प्रभाव पडत असल्याचे म्हणता येईल. प्राप्त माहितीनुसार, प्रभारी नगरपरिषद अभियंता डवले सुमारे सहा महिन्यांपूर्वी गोंदिया नगरपरिषदेत आले. पूर्वीचे दोन वर्ष कनिष्ठ अभियंता म्हणून कार्य केल्यावर त्यांच्याकडे पालिका अभियंत्यांचा प्रभार देण्यात आला आहे. यातच त्यांचा पालिकेतील राजकारणाशी जवळचा संबंध आला असावा व त्यांनी १७ एप्रिल पासून दिर्घ सुटीवर जाण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना अर्ज दिला. या अर्जाची विशेषता अशी की, त्यात डवलेंनी पालिकेतील राजकीय व प्रशासकीय वातावरणात काम करण्यात व त्यात जुळवून घेण्यास अडचण व त्रास होत असल्याचे नमूद आहे. त्यांच्या या पत्रानुसार, पालिकेतील राजकारण शिवाय प्रशासनामुळे त्यांना कामे करण्यात अडचण होत असल्याचे स्पष्ट होते. अशात राजकारण आता येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वरचढ होत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. (शहर प्रतिनिधी)कनिष्ठ अभियंता कावडे निलंबित एकीकडे डवले दीर्घ रजेवर गेले असतानाच दुसरीकडे पालिकेतील कनिष्ठ अभियंता रवींद्र कावडे यांना मुख्याधिकाऱ्यांनी निलंबीत केले आहे. प्रशासकीय अधिकारी राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्याधिकारी मागील महिन्यांपासून कनिष्ठ अभियंता कावडे यांना मजुरांच्या भविष्य निर्वाह निधी कपातीबाबतची माहिती मागत होते. मात्र कावडे यांनी सदर माहिती सादर केली नाही. परिणामी मुख्याधिकाऱ्यांनी त्यांना निलंबीत केले असून २३ एप्रिल रोजी तसे आदेश काढण्यात आले आहे. मी सुटीवर गेलो होतो, मात्र आता माझी नाराजी दूर झाली आहे. आता मी परत आलो आहे. - सुनील डवले नगर परिषद अभियंता