शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अजब प्रेमाची गजब कहानी; बालमित्राला मिळवण्यासाठी तिने केला चक्क त्याच्या बायकोच्या खुनाचा प्लॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2022 07:30 IST

Gondia News बालपणीच्या मित्रासोबत लग्न करण्यासाठी त्याच्या बायकोलाच ठार करण्याचा बेत एका महिला वकिलाने केला आणि पुढे असे घडले...

ठळक मुद्देमुलीचा टाहो अन् पाझरले सुरजचे मन

नरेश रहिले

गोंदिया : खेळण्या-बाळगण्याच्या वयात प्रेमाची भाषा समजणारे मुले-मुली मोठ्या वयात कोणत्या स्तराला जातात याचेच एक उदाहरण म्हणजे गोंदियातील एका वकील महिलेचे प्रकरण आहे. अगदी बालवयापासून तर प्राथमिक शिक्षण ज्या मुलासोबत घेतले आज तो दोन मुलींचा पिता असतानाही त्याला नवरा बनविण्याची मनोमन इच्छा वकील महिलेने ठेवली. त्याला नवरा बनविण्यासाठी चक्क त्याच्या बायकोचा ‘गेम’ करण्याचा प्लान तिने तयार केला. चार लाखांत तिची सुपारी दिली. परंतु ज्याला सुपारी दिली त्याला घर दाखविले खून करायचा आहे, ती व्यक्ती त्याला निश्चित माहीत असावी म्हणून सुपारी घेणाऱ्यासोबत सोनल शर्माचे घर गाठले.

सोनल शर्माचे पती आशिष शर्मा लहान असताना त्यांच्यासोबत कॉन्व्हेंटपासून तर प्राथमिक शिक्षण सोबत घेणाऱ्या वकील महिलेचे प्रेम शर्मांवर जडले. परंतु प्राथमिक शिक्षणानंतर त्या दोघांचाही संपर्क झाला नाही. वयात आल्यावर दोघांचेही वेगवेगळे लग्न झाले. आशिष शर्माला दोन मुली, तर आरोपी वकील महिलेला एक मुलगी आहे. परंतु वकील महिला ही आशिष शर्मावर प्रेम करीत असल्याने त्याची पत्नी सोनल हिचा काटा काढण्याचा गेम वकील महिलेने तयार केला. तीन महिन्यांपूर्वी चांदपूरला जाण्यासाठी भाड्याचे वाहन घेतले त्या भाड्याच्या वाहनाचा चालक सुरज केशव रावते (५०, रा. टी.बी. टोली), गोंदिया याला तिने सुपारी घेण्यासाठी तयार केले. आपल्या घरातील एक समस्या दूर करण्यासाठी सुरजने वकील महिलेला विनवणी केली होती. त्या समस्येच्या निवारणाच्या बदल्यात वकील महिलेने सोनलची सुपारी दिली होती. परंतु त्याने सुपारी घेण्यास नकार दिल्याने त्याला चार लाखांचे आमिष दिले. पैशाच्या लोभापायी सुरज रावते याने सोनलचा खून करण्याची तयारी दर्शविली. सोनलची ओळख व तिचा घर दाखविण्यासाठी वकील महिला आरोपी सुरजच्या दुचाकीवर बसून तिच्या गणेशनगर येथील घरापर्यंत गेली. घराच्या काही अंतरावर थांबून वकील महिलेने सुरजला कुरिअर बॉय म्हणून फोन करण्यास सांगितले. कुरिअरचे पार्सल घेण्यासाठी आलेल्या सोनलवर चाकूने वार करण्याचा इशारा वकील महिलेने करताच आरोपी सुरजने तिच्यावर चाकूने हल्ला केला, अशी माहिती सुरज रावते यांनी पोलिसांना दिली आहे. बचपन का प्यार मेरा भूल नही जाना रे... हा सांगणारा प्रसंग लहानपणात झालेल्या प्रेमाला आता मिळविण्यासाठी एका निरपराध महिलेच्या जीवावर बेतत होता हे खरे.

सुरजला सोनलने धरून आपटले

सुरजने कमरेत खोचलेला चाकू काढून सोनलच्या गळ्यावर मारत असताना त्या चाकूला अडविण्यासाठी सोनलने हात पुढे केल्याने चाकू तिच्या हाताला लागला. यावेळी सोनलने आरोपी सुरजला उचलून जमिनीवर आपटताच वकील महिला पायीच धावत धावत घराबाहेर सुटली. आरोपी सुरजही तिथून आपली सुटका करून वाहन घेऊन पसार झाला.

मुलीचा टाहो अन् पाझरले सुरजचे मन

सोनलचा खून करण्यासाठी गेलेल्या सुरजने सोनलवर चाकूने हल्ला करताच त्याच्या पाठीवर असलेली बॅग सोनलची १३ वर्षांची मुलगी ओढत आरडाओरड करीत होती. माझ्या आईला मारू नका हा तिचा टाहो सुरजच्या कानी पडताच आपल्यालाही तीन मुली आहेत ही भावना त्याच्या मनात आली. त्याचेही मन कळवळू लागले आणि त्याने तिला सोडून पळ काढला.

पुरावा नष्ट करण्यासाठी जाळले कपडे

आरोपी सुरजने हल्ला केल्यानंतर या घटनेचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्या दिवशी वापरलेले कपडे त्याने सूर्याटोला येथील बांधतलावावर जाऊन अंत्यसंस्कार करण्यात येणाऱ्या ठिकाणी ते रक्ताने माखलेले कपडे जाळले. त्यानंतर त्या कपड्याची राख बांधतलावात विसर्जन केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी