घरी जात असलेल्या चिमुकल्याला ट्रकने चिरडले; नागरिकांची जाळपोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2023 19:54 IST2023-03-30T19:53:40+5:302023-03-30T19:54:14+5:30
Gondia News आपल्या दुकानातून जवळच असलेल्या घरी जाण्यासाठी निघालेल्या चिमुकल्याला विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने जागीच चिरडून ठार केल्याची घटना येथे घडली.

घरी जात असलेल्या चिमुकल्याला ट्रकने चिरडले; नागरिकांची जाळपोळ
गोंदिया : आपल्या दुकानातून जवळच असलेल्या घरी जाण्यासाठी निघालेल्या चिमुकल्याला विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने जागीच चिरडून ठार केल्याची घटना येथे घडली. संतप्त झालेल्या जमावाने ट्रकला आग लावून दिली. राफन अफरोज शेख (९ वर्ष) असे या मुलाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी संध्याकाळी ६.३० च्या सुमारास घडली.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी ट्रकला पेटवून दिले. आज रामनवमी व रमजानचा महिना सुरू असल्याने परिसरात तणावाचे वातावरण होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.