शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

95 मालमत्तांना ठोकले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 5:00 AM

आतापर्यंत नगरपरिषद मालमत्ता वसुलीसाठी पथकाला नानाविध अडचणींचा सामना करावा लागत होता. कधी राजकीय दबाव तर कधी थकबाकीदारांकडून भांडण तंटे केले जात असल्याने करवसुली होत नव्हती. परिणामी यंदा ११ कोटींच्या घरात मागील थकबाकी व चालू मागणीचा आकडा पोहोचला आहे. मात्र, विद्यमान मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी यंदा करवसुलीसाठी विभागाला कुणालाही न जुमानता थेट कारवाईचे अधिकारी दिले आहेत. 

ठळक मुद्देसंबंधितांवर १.३२ कोटींची थकबाकी : करवसुली पथकाचा धडाका सुरूच

लाेकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मालमत्ता करवसुलीसाठी यंदा नगरपरिषदेने कंबर कसली असून करवसुली पथक जोमाने कामाला लागले आहे. विशेष म्हणजे, यंदा पथकाने कुणाचाही गय न करता थकबाकीदारांवर थेट कारवाईचा सपाटाच सुरू केला आहे. याअंतर्गत एक कोटी ३२ लाख सात हजार रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी पथकाने शहरातील ९५ मालमत्तांना सील ठोकले आहे. यामध्ये सर्वाधिक दुकानांचा समावेश आहे. करवसुली पथकाकडून होत असलेल्या सिलिंगच्या कारवाईमुळे थकबाकीदार चांगलेच धास्तीत आले आहेत. आतापर्यंत नगरपरिषद मालमत्ता वसुलीसाठी पथकाला नानाविध अडचणींचा सामना करावा लागत होता. कधी राजकीय दबाव तर कधी थकबाकीदारांकडून भांडण तंटे केले जात असल्याने करवसुली होत नव्हती. परिणामी यंदा ११ कोटींच्या घरात मागील थकबाकी व चालू मागणीचा आकडा पोहोचला आहे. मात्र, विद्यमान मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी यंदा करवसुलीसाठी विभागाला कुणालाही न जुमानता थेट कारवाईचे अधिकारी दिले आहेत. त्यामुळे कर अधिकारी व उपमुख्याधिकारी विशाल बनकर यांनी पथक स्थापन केले असून वसुली मोहिमेला सुरूवात केली आहे. हे पथक थकबाकीदारांकडे जात असून कराचा भरणा केल्यास थेट सीलिंगची कारवाई करत आहे. यातूनच पथकाने आतापर्यंत एक कोटी ३२ लाख सात हजार रुपयांचा मालमत्ता कर थकवून बसलेल्या मालमत्ताधारकांच्या ९५ मालमत्तांना सील ठोकले आहे. सील ठोकण्यात आलेल्या या मालमत्तांमध्ये सर्वाधिक ६७ दुकानी असून ९ घर, ४ मोबाईल टॉवर, १ बँक, ५ एटीएम, ३ खासगी इमारत, २ शासकीय इमारत, २ हॉटेल व २ गोदाम आहेत. एक कोटी ३२ लाख सात हजार रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी करवसुली पथकाने या मालमत्तांना सील ठोकले आहे. दररोज करवसुली पथक वसुलीसाठी थकबाकीदारांकडे जात असून कराचा भरणा न करण्यांची मालमत्ता सील करत आहेत. परिणामी थकबाकीदारांत चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे. 

सध्या ९ मालमत्तांनाच आहे सील पथकाने आतापर्यंत ९५ मालमत्तांना सील ठोकले असून या कारवाईनंतर मालमत्ताधारकांनी त्यांच्याकडील थकबाकी भरली आहे. अशात त्यांच्या मालमत्ताचे सील काढण्यात आले आहे. मात्र, सध्या ९ मालमत्तांना सील असून यामध्ये ६ दुकान, २ घर व १ गोदाम आहे. संबंधितांकडील करांचा भरणा आल्यावर यांचेही सील उघडून दिले जाईल. यंदा होणार रेकार्ड ब्रेक वसुली नगरपरिषद करवसुली पथकाच्या धडाकेबाज वसुलीमुळे यंदा थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे. कराचा भरणा करा अन्यथा मालमत्तांची जप्ती हेच धोरण नगरपरिषदेने हाती घेतले आहे. परिणामी आता थकबाकीदार नगरपरिषदेत जाऊन करांचा भरणा करताना दिसत आहे. नगरपरिषदेत आतापर्यंत ५१ टक्के सर्वाधिक करवसुलीचा रेकॉर्ड आहे. मात्र, यंदा जोमात वसुली होत असल्याने जुना रेकॉर्ड ब्रेक होणार असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Taxकर