शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

९१ हजार चिमुकले करणार बीज संकलन

By admin | Updated: May 5, 2016 01:40 IST

चिमुकल्यांच्या हातून रानावनातील व शेतातील विविध झाडांचे बीज संकलन करून आपापल्या शाळेत रोपवाटिका तयार करण्याचा उपक्रम सुरू करावा,

वृक्षसंवर्धनासाठी घेतला पुढाकारनरेश रहिले गोंदियाचिमुकल्यांच्या हातून रानावनातील व शेतातील विविध झाडांचे बीज संकलन करून आपापल्या शाळेत रोपवाटिका तयार करण्याचा उपक्रम सुरू करावा, असे पत्र शिक्षण विभागाने सर्व मुख्याध्यापकांना दिले आहे. गोंदिया जिल्ह्यातील वर्ग १ ते १२ पर्यंतचे ९१ हजार १४२ विद्यार्थी आता बीज संकलन करून त्याची रोपवाटिका तयार करणार आहेत. वृक्ष संवर्धनातून पर्यावरण रक्षणाचा हा अनोखा उपक्रम नवीन शैक्षणिक सत्रात राबविला जाणार आहे.बालमनावर जसे संस्कार रूजवले तसाच तो व्यक्ती घडत जातो. लहानपणापासून शिक्षणाबरोबर सामाजिक उपक्रमही मुलांनी राबवावे यासाठी जिल्हा परिषदेने आता पुढाकार घेतला आहे. ग्लोबल वार्मिंगची समस्या घर करून आहे. वृक्षांचा झालेला विनाश पाहून आता विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वृक्षसंवर्धन करणे ठरविले आहे. उन्हाळ्याच्या सुट्या किंवा सुट्या संपताच विद्यार्थ्यानी आपापल्या परिसरातील बीज संकलन करून वर्गशिक्षकाच्या माध्यमातून रोपवाटिका टाकली जाणार आहे. त्या रोपवाटिकेचे रोपटे त्या विद्यार्थ्याना गावातीलच परिसरात रस्त्यावर, मायरानावर, टेकडीवर वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला जाणार आहे. जिल्ह्यात वर्ग १ ते १२ वी पर्यंत ९१ हजार १४२ विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी बीज संकलन करून रोपटे लावणार आहेत. आमगाव तालुक्यात ९ हजार ६५०, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात १० हजार ४६५, देवरी ६ हजार ७७४, गोंदिया २३ हजार ९००, गोरेगाव ९ हजार ७४०, अडक-अर्जुनी ८ हजार १९६, सालेकसा ७ हजार ९३४, तिरोडा १४ हजार ४८३ विद्यार्थी बीज संकलन करणार आहेत. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही प्रक्रिया केली जाणार आहे. वनीकरण विभागाला मागितले दीड लाख रोपटेयंदा बीज संकलनाचा कार्यक्रम जि.प. शाळांच्या माध्यमातून घेऊन वृक्ष लागवड केली जाणार आहे. परंतु जि.प. शाळांकडे एवढे रोपटे उपलब्ध नसल्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळ व वनविभागाला पत्र पाठवून दीड लाख रोपटे उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. यासाठी पत्रव्यवहार करण्यात आल्याचे सर्वशिक्षा अभियानातील बिसेन यांनी सांगितले.