शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

गारपिटीमुळे ८३ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 06:00 IST

सोमवारी (दि.२५) गारपीट आणि अवकाळी पावसामुळे सर्वाधिक कौलारुंच्या घराचे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे घरावरील छत उडाल्याने व घरे आणि गोठ्यांवर झाडांची पडझड झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.याचा सर्वाधिक फटका सालेकसा, सडक अर्जुनी, गोंदिया, आमगाव तालुक्याला बसला आहे.

ठळक मुद्दे१६०९ घरांची पडझड : महसूल विभागाचे सर्वेक्षणातील माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात २५ फेब्रुवारीला झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी पिकांसह मालमत्तेचे सुध्दा नुकसान झाले. महसूल विभागाने केलेल्या सर्वेक्षणात वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे एकूण १६०९ घरे आणि गोठ्यांची पडझड होऊन ८३ लाख ४२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे महसूल विभागाने केलेल्या सर्वेक्षणात पुढे आले आहे.नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाकडे पाठविला असून शासनाकडून आपदग्रस्तांना किती नुकसान भरपाई दिली जाते याकडे लक्ष लागले आहे.सोमवारी (दि.२५) गारपीट आणि अवकाळी पावसामुळे सर्वाधिक कौलारुंच्या घराचे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे घरावरील छत उडाल्याने व घरे आणि गोठ्यांवर झाडांची पडझड झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.याचा सर्वाधिक फटका सालेकसा, सडक अर्जुनी, गोंदिया, आमगाव तालुक्याला बसला आहे. आमगाव तालुक्यात ४१ घरे आणि गोठ्यांची, सालेकसा तालुक्यात १४८० घरे आणि गोठे,सडक अर्जुनी तालुक्यात ६२ घर आणि गोठे व गोंदिया तालुक्यात १३ आणि तिरोडा तालुक्यात ४ घरे आणि गोठ्यांची पडझड झाली. यामुळे ८३ लाख ४२ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले.सदर नुकसानीचे पंचनामे महसूल विभागाच्या यंत्रणेतंर्गत करण्यात आले.तसेच या नुकसानीचा अहवाल गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाकडे पाठविला आहे. शासनाकडून नुकसान भरपाई जाहीर होईपर्यंत नुकसानग्रस्तांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.अवकाळी पावसामुळे ९७४ हेक्टरमधील पिके बाधितअवकाळी पाऊस आणि गारपिटीचा सर्वाधिक फटका रब्बी हंगामातील पिकांना व भाजीपाल्याला बसला. जिल्हाधिकारी कार्यालयाने पाठविलेल्या अहवालात ९७४ हेक्टरमधील पिके बाधीत झाले आहे. यात २७२ हेक्टरचे ३३ टक्केच्या आत तर ७०२ हेक्टरचे ३३ टक्केच्यावर नुकसान झाले आहे. या नुकसानीत अजुन वाढ होण्याची शक्यता महसूल विभागाने वर्तविली आहे. दरम्यान हा सर्व अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे.पीक विम्या कंपन्याकडे नजराजिल्ह्यात ३५ हजार हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे. यात सर्वाधिक क्षेत्र धानाचे असून त्या पाठोपाठ गहू आणि हरभरा या पिकांचे आहे. बºयाच शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत रब्बी पिकांचा विमा उतरविला होता. त्यामुळे ३३ टक्केच्यावर ७०२ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले असून पीक विमा कंपन्या आता शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यासाठी नेमका कोणता निकष लावतात. याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :agricultureशेतीCrop Insuranceपीक विमा