गोंदिया जिल्ह्यात ग्रामपंचायतसाठी ७३.१६ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 10:58 AM2021-01-16T10:58:04+5:302021-01-16T10:58:22+5:30

Gondia News गोंदिया जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतसाठी शुक्रवारी (दि.१५) एकूण ६५३ मतदान केंद्रावरुन मतदान घेण्यात आले. यात दुपारी ३.३० वाजेपर्यंत ७३.१६ टक्के मतदान झाले होते.

73.16 percent polling for Gram Panchayat in Gondia district | गोंदिया जिल्ह्यात ग्रामपंचायतसाठी ७३.१६ टक्के मतदान

गोंदिया जिल्ह्यात ग्रामपंचायतसाठी ७३.१६ टक्के मतदान

Next

१८९ ग्रामपंचायत : १६९३ जागा : ३१५१ उमेदवार

गोंदिया : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतसाठी शुक्रवारी (दि.१५) एकूण ६५३ मतदान केंद्रावरुन मतदान घेण्यात आले. यात दुपारी ३.३० वाजेपर्यंत ७३.१६ टक्के मतदान झाले होते. जिल्ह्यातील आठही तालुक्यात मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. नक्षल प्रभावित तालुक्यातसुध्दा मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. या तालुक्यामध्ये ८० टक्क्यावर मतदान झाले होते.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. अर्जुनी मोरगाव, देवरी, सालेकसा या तालुक्यांमध्ये सकाळी ७.३० ते ३.३० या कालावधीत मतदान घेण्यात आले. ग्रामपंचायत निवडणूक ही स्थानिक पातळीवर लढविली जात असल्याने आणि या निवडणुकीत एक एक मत महत्वपूर्ण ठरत असल्याने सकाळपासूनच मतदारांना मतदानासाठी जाण्यासाठी उमेदवार मनधरणी करताना चित्र दिसत होते. बहुतेक मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. वयोवृद्ध नागरिक, दिव्यांग यांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली होती. तर उमेदवार हे एक एक मताचे गणित जुळविण्यासाठी गावातील कोणता मतदार मतदान करण्यापासून वंचित तर राहिला नाही ना याची काळजी घेताना दिसून आले. मतदारांमध्येसुध्दा मतदानाला घेऊन उत्साह दिसून आला. आपल्या गावाच्या विकासाची धुरा कोणत्या उमेदवारांवर सोपवायची यासाठी मतदारांनी आधीच निर्धार केल्याचे चित्र होते. जिल्ह्यात दुपारी ३.३० वाजेपर्यंत एकूण ७३.१६ टक्के मतदान झाले होते. जिल्ह्यातील एकूण ३ लाख २२ हजार ९९९ मतदारांपैकी .... मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.

नक्षलप्रभावित तालुक्यात सर्वाधिक मतदान

जिल्ह्यातील सालेकसा, देवरी, अर्जुनी मोरगाव या नक्षलप्रभावित भागातील मतदारांमध्ये मतदानाप्रती उत्साह दिसून आला. मतदारांनी सकाळपासूनच मतदान केेंद्रावर गर्दी केली होती. तर काही केंद्रावर सायंकाळी ५ वाजतापर्यंत मतदारांची गर्दी होती. या नक्षलप्रभावित तालुक्यांमध्ये ८० टक्केच्या जवळपास मतदान झाले होते.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना

कोरोनाच्या सावटाखाली ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्याने सर्वच मतदान केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात आल्या. सॅनिटायझर, थर्मल गन तसेच आरोग्य सेवकांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच केंद्रावरील अधिकारी याची काळजी घेताना दिसून येत होते.

वयोवृद्ध, दिव्यांगासाठी व्हीलचेअर

लोकसभा व विधानसभा निवडणुकीप्रमाणेच ग्रामपंचायत निवडणुकीतसुध्दा सर्वच मतदान केंद्रावर वयोवृद्ध आणि दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली होती. तर नातेवाईक आपल्या वयोवृद्ध आजी, आजोबांना उचलून मतदान केंद्रावर घेऊन जातानाचे चित्र पहायला मिळाले.

मतदान केंद्राची सजावट

मतदान प्रक्रिया ही लोकशाहीचा उत्सव असल्याने ती तेवढ्याच उत्साहात पार पडण्यासाठी अनेक मतदान केंद्राची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

अशी आहे मतदानाची तालुकानिहाय टक्केवारी

गोंदिया ६५.४८ टक्के, तिरोडा ७०.३५, गोरेगाव ६७.८०, आमगाव ७८.६७, अर्जुनी मोरगाव ८१.२५ टक्के, सडक अर्जुनी ८०.९५ टक्के, सालेकसा ७९.८२, देवरी ७७.३७ टक्के मतदान झाले होते.

.....

Web Title: 73.16 percent polling for Gram Panchayat in Gondia district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.