शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

७१४१ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 05:00 IST

कोरोना बाधित आढळलेल्या रुग्णांवर येथील जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. बुधवारी (दि.२२) तीन कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने त्यांना कोविड केअर सेंटरमधून सुट्टी देण्यात आली. तर गोंदिया येथील सिव्हिल लाईन परिसरात एक कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने त्याला येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देतीन कोरोना बाधित कोरोनामुक्त : एका कोरोना बाधिताची भर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ७४७८ स्वॅब नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. यापैकी २३६ स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले.तर ७१४१ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. २० स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे. तर ८७ स्वॅब नमुन्यांच्या अहवालाबाबत अद्यापही अनिश्चितता कायम आहे.मागील तीन चार दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.कोरोना बाधित आढळलेल्या रुग्णांवर येथील जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. बुधवारी (दि.२२) तीन कोरोना बाधित कोरोनामुक्त झाल्याने त्यांना कोविड केअर सेंटरमधून सुट्टी देण्यात आली. तर गोंदिया येथील सिव्हिल लाईन परिसरात एक कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने त्याला येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण २११ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहेत. तर एकूण कोरोना बाधितांची संख्या २३६ वर पोहचली आहे. जिल्ह्यात सध्या स्थितीत १९ कोरोना अ‍ॅक्टीव्ह रुग्ण असून त्यांच्यावर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. बाहेरील जिल्हा आणि राज्यातून परतणाऱ्यांना संस्थात्मक क्वारंटाईन कक्षात ठेवले जात आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यात २७६ जण संस्थात्मक क्वारंटाईन तर १०५५ जण होम क्वारंटाईन आहेत.७६६ जणांची अँटीजेन रॅपिड टेस्टकोरोना विषाणूचा जिल्ह्यात संसर्ग वाढू नये, यासाठी कोरोना संशयित असलेल्या किंवा बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा रॅपिड अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून जिल्ह्यातील ७६६ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये ७६१ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले तर पाच व्यक्ती या अँटीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आले आहे.जिल्ह्यात २४ कंटेन्मेंट झोनकोरोना बाधित रुग्ण आढळलेल्या परिसरात प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी कंटेन्मेंट झोन घोषीत केले जात आहे. जिल्ह्यात सध्या स्थितीत एकूण २४ कंटेन्मेंट झोन आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील मुंडीपार,फतेहपूर, डोंगरगाव, सेजगाव,पारडीबांध, कुंभारेनगर व सिव्हिल लाईन, सालेकसा तालुक्यातील पाऊलदौना, रामाटोला, पाथरी व शारदानगर, तिरोडा तालुक्यातील तिरोडा (सुभाष वॉर्ड), बेरडीपार, बेलाटी/खुर्द, वीर सावरकर वार्ड, भुतनाथ वार्ड, किल्ला वार्ड आणि गराडा, गोरेगाव तालुक्यातील भडांगा, घोटी व डव्वा आणि सडक अर्जुनी तालुक्यातील राका, सौंदड व खोडशिवणीचा समावेश आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या