शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे आगाराला ७ कोटीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:00 IST

गोंदिया आगारात ८० बसेस आहेत. या ८० बसेस दिवसाकाठी ३८० फेऱ्या मारत होत्या. या फेऱ्याच्या माध्यमातून १२ लाख रूपयाचे उत्पन्न एका दिवशी आगाराला मिळत होते. परंतु कोरोना विषाणूच्या संसर्गाने २३ मार्चपासून संचारबंदी घोषीत झाल्याने सर्व बस फेऱ्या बंद करण्यात आल्या. परिणामी गोंदिया आगाराला दिवसाकाठी १२ लाख रूपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्दे८० पैकी धावतात ९ बसेस रस्त्यावर : एक कर्मचारी एकच मास्कचे धोरण

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देशात सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. याचा फटका गोंदिया आगाराला बसला आहे. २३ मार्चपासून १८ मे या ५८ दिवसात आगाराला ७ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. गोंदिया जिल्हा ग्रीन झोनमध्ये असल्याने बससेवा सुरू करण्यात आली असली तर केवळ ९ बसेस रस्त्यावर धावत आहे. त्यातही उत्पन्न मिळत नसल्याने या बसेस चालविणे सुध्दा गोंदिया आगारासाठी तोट्याचे ठरत आहे.गोंदिया आगारात ८० बसेस आहेत. या ८० बसेस दिवसाकाठी ३८० फेऱ्या मारत होत्या. या फेऱ्याच्या माध्यमातून १२ लाख रूपयाचे उत्पन्न एका दिवशी आगाराला मिळत होते. परंतु कोरोना विषाणूच्या संसर्गाने २३ मार्चपासून संचारबंदी घोषीत झाल्याने सर्व बस फेऱ्या बंद करण्यात आल्या. परिणामी गोंदिया आगाराला दिवसाकाठी १२ लाख रूपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. ५८ दिवसात गोंदिया जिल्ह्याच्या बस आगाराला ६ कोटी ९६ लाख म्हणजे जवळजवळ सात कोटी रूपयांचा फटका बसला आहे.गोंदियात एक कोरोनाचा रूग्ण आढळला होता. परंतु तो कोरोनामुक्त झाल्याने जिल्हा ग्रीन झोनमध्ये आला. त्यामुळे जिल्ह्यात अंशत: सूट देण्यात आली होती. त्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांच्या सेवेसाठी एसटी सुरू करण्यात आली.८० बसेसपैकी नऊ बस सुरू करण्यात आल्या. त्या नऊ बस ५२ फेऱ्या मारीत आहेत. परंतु या फेऱ्यांमध्ये प्रवासी मिळत नसल्याने त्या फेऱ्यांमधून बसेसच्या डिझलचा खर्च निघणे सुध्दा कठीण जात आहे. त्यामुळे आता नवीन बस फेऱ्या वाढविणे सद्या स्थितीत शक्य नाही, असे आगार प्रमुखांनी लोकमतशी बोलताना सांगितले.प्रत्येक कर्मचाऱ्याला एक कापडी मास्ककर्मचाऱ्यांची सुरक्षितता म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्याला एक कापडी मास्क देण्यात आले आहे. बसेस आगारातून सोडण्यापूर्वी त्या सॅनिटाईज केल्या जातात. बस आगारात परत आली की पुन्हा सॅनिटाईझरची फवारणी केली जात आहे. एसटीच्या वाहकांनाच मास्क द्याव्यात अश्या सूचना असताना मास्क शिल्लक असल्यामुळे चालकांनाही मास्क देण्यात आले. परंतु प्रत्येकाला एकच कापडी मास्क देण्यात आला आहे.कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात नाहीएसटी कर्मचारी कामावर येण्यास तयार आहे. परंतु महामंडळाकडून तेवढ्या कर्मचाऱ्यांना एकत्र बोलविणे लॉकडाऊनच्या काळात शक्य नाही. या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात झाली नाही. तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना हा दिलासा असला तरी कोरोनाच्या दृष्टीने त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.सुरक्षिततेच्या दृष्टीने कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक कापडी मास्क वाटप केले. तसेच सॅनिटाईझरने बसची फवारणी करण्यात येते. सद्या नऊ बसेसच्या ५२ फेऱ्या सुरू आहेत. परंतु एसटीला उत्पन्न मिळत नसल्याने पुढच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या नाही.- संजना पटले,आगार प्रमुख गोंदिया.

टॅग्स :Socialसामाजिक