शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

६६४ विद्यार्थ्यांनी घेतला आरटीईअंतर्गत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 10:43 IST

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. सन २०२०-२१ चे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू झाले आहे. सद्यस्थितीत केंद्रावर पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी करणे अडचणीचे आहे.

ठळक मुद्दे५६ विद्यार्थ्यांना प्रवेशाची तारीख दिली नाही : २३९ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश देण्याची तरतूद आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शाळा उशीरा सुरू होत असल्याने आरटीईच्या प्रवेशाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.आतापर्यंत गोंदिया जिल्ह्यातील ९०३ जागांपैकी ६६४ जागांवर प्रवेश निश्चीत झाला आहे. उर्वरीत २३९ जागांवर प्रवेश झाला नाही.शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या वर्षासाठी आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेशाबाबत ऑनलाईन अर्ज मागवून १७ मार्च २०२० रोजी लॉटरी काढण्यात आली होती. या लॉटरीद्वारे १ लाख ९२० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. ७५ हजार ४६५ विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी जाहीर केली. सर्व विद्यार्थ्यांना मेसेज पाठविण्यात आले आहेत. लॉकडाऊनमुळे पुढील प्रवेश प्रक्रियेचे काम काम झाले नाही.शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. सन २०२०-२१ चे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू झाले आहे. सद्यस्थितीत केंद्रावर पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी करणे अडचणीचे आहे. त्यामुळे केवळ या शैक्षणिक वर्षासाठी शाळास्तरावर कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी करून संकलन करून पडताळणी समितीच्या मान्यतेने प्रवेश देण्यात येत आहे. शाळेत आरटीई पोर्टलवर त्यांच्या लॉगिन विद्यार्थ्यांची नावे व मोबाईल क्रमांक दिले आहेत.या नावापुढे या दिनांकास विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बोलवायचे आहे ती तारीख शाळा देत आहे. गर्दी होणार नाही अशा प्रकारे शाळेचे नियोजन करावे व कोणत्या तारखेला बोलावे हे शाळा ठरवित आहे. जिल्ह्यातील ९०३ जागांसाठी ३ हजार ६५८ अर्ज आले होते. प्रवेश घेण्यासाठी ८४७ बालकांच्या पालकांना तारीख देण्यात आली आहेत. तर ५६ बालकांच्या पालकांना तारीख देण्यात आली नाही.२३९ विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया झाली नाहीअर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या ९१ जागांसाठी ८६ बालकांच्या पालकांना तारीख देण्यात आली. ५ जणांना तारीख दिली नाही तर ७४ बालकांचा प्रवेश झाला आहे. आमगाव ८७ जागांसाठी ८६ बालकांच्या पालकांना तारीख देण्यात आली. १ जणाला तारीख दिली नाही तर ७३ बालकांचा प्रवेश झाला आहे. देवरी ५५ जागांसाठी ५५ बालकांच्या पालकांना तारीख देण्यात आली. २५ बालकांचा प्रवेश झाला आहे. गोंदिया ३५६ जागांसाठी ३२९ बालकांच्या पालकांना तारीख देण्यात आली. २७ जणांना तारीख दिली नाही तर २६५ बालकांचा प्रवेश झाला आहे. गोरेगाव ७४ जागां आहेत त्या सर्वांना तारीख दिली तर ६४ बालकांचा प्रवेश झाला आहे. सालेकसा ४४ जागांसाठी ४३ बालकांच्या पालकांना तारीख देण्यात आली. १ जणांना तारीख दिली नाही तर २१ बालकांचा प्रवेश झाला आहे. सडक-अर्जुनी ४५ जागांसाठी ३४ बालकांच्या पालकांना तारीख देण्यात आली. ११ जणांना तारीख दिली नाही तर २६ बालकांचा प्रवेश झाला आहे. तिरोडा १५१ जागांसाठी १४० बालकांच्या पालकांना तारीख देण्यात आली. ११ जणांना तारीख दिली नाही तर ११६ बालकांचा प्रवेश झाला आहे. गोंदिया जिल्हाभरात ९०३ जागांसाठी ८४७ बालकांच्या पालकांना तारीख देण्यात आली. ५५ जणांना तारीख दिली नाही तर ६६४ बालकांचा प्रवेश झाला आहे.

टॅग्स :Schoolशाळा