शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

३९ पोलीस पदांसाठी ६३४१ उमेदवारांचे अर्ज

By admin | Updated: March 22, 2017 01:10 IST

जिल्ह्याची पोलीस शिपाई भरती प्रक्रिया बुधवारपासून सुरू होत आहे. एकूण ४४ पोलीस शिपाई पदाच्या जागा असल्या तरी

आजपासून शारीरिक चाचणी : ४८ कॅमेरे ठेवणार भरतीवर नजर गोंदिया : जिल्ह्याची पोलीस शिपाई भरती प्रक्रिया बुधवारपासून सुरू होत आहे. एकूण ४४ पोलीस शिपाई पदाच्या जागा असल्या तरी यापैकी पाच जागा अनुकंपावरील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे उरलेल्या ३९ जागांसाठी तब्बल ६ हजार ३४१ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी २२ मार्चपासून सुरू होणार आहे. प्रभारी पोलीस अधीक्षक राकेशचंद्र कलासागर, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनात सदर भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. ३९ जागांपैकी ११ जागा महिलांसाठी असून या जागांसाठी १ हजार २४१ महिलांनी अर्ज केले आहे. २८ पुरूषांच्या जागांसाठी ५ हजार १०० पुरूषांनी अर्ज केले आहे. या भरती प्रक्रीयेसाठी खुल्या प्रवर्गाला ३५० रूपये तर आरक्षण असलेल्या प्रवर्गाला २०० रूपये शुल्क आहे. बुधवारी सकाळी ५ वाजतापासून पोलीस मुख्यालय कारंजा येथील प्रांगणात शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. नवीन बायपास रस्त्यावर १६०० मीटर धावण्याची चाचणी घेण्यात येईल. तसेच लांब उडी, उंच उडी १०० मीटर धावणे व पुलअप्स हे मुख्यालयात घेण्यात येणार आहे. या भरतीवर करडी नजर ठेवण्यासाठी २६ सीसीटीव्ही कॅमेरे तर २२ व्हिडीओ कॅमेरे बसविले आहेत. शारीरिक चाचणीत चांगले गुण घेणाऱ्या उमेदवारांमधून एका पदामागे १५ उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी पात्र ठरविले जाईल. बारावी उत्तीर्ण ही या भरती प्रक्रियेची शैक्षणिक पात्रता आहे. (तालुका प्रतिनिधी) ५०६ अधिकारी-कर्मचारी करणार बंदोबस्त या पोलीस भरती प्रक्रियेसाठी ६५ अधिकारी तर ४४३ कर्मचारी बंदोबस्त करणार आहेत. यात एक पोलीस अधीक्षक, एक अपर पोलीस अधीक्षक, तीन उपविभागीय पोलीस अधिकारी, १६ पोलीस निरीक्षक, २३ सहायक पोलीस निरीक्षक, २१ उपनिरीक्षक, ४०८ पोलीस कर्मचारी, तर ३५ लिपीक वर्गातील कर्मचारी या भरती प्रक्रियेत सहभागी झाले आहेत.