खरिपासाठी ६३ हजार क्विंटल बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 20:54 IST2019-04-25T20:53:06+5:302019-04-25T20:54:08+5:30

तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्याचे लागवड क्षेत्र २ लाख २० हजार २४६ हेक्टर आहे. परंतु यातील अर्ध्यापेक्षा कमी म्हणजेच ९८ हजार ६१९ हेक्टरमधील शेती सिंचनाखाली आहे. उर्वरीत शेती कोरडवाहू आहे.

63 thousand quintals of seed for Kharif | खरिपासाठी ६३ हजार क्विंटल बियाणे

खरिपासाठी ६३ हजार क्विंटल बियाणे

ठळक मुद्दे२ लाख ८६ हजार शेतकरी : जिल्ह्यात २ लाख २० हजार हेक्टर लागवड क्षेत्र

नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्याचे लागवड क्षेत्र २ लाख २० हजार २४६ हेक्टर आहे. परंतु यातील अर्ध्यापेक्षा कमी म्हणजेच ९८ हजार ६१९ हेक्टरमधील शेती सिंचनाखाली आहे. उर्वरीत शेती कोरडवाहू आहे. लागवडीचे क्षेत्र मोठे असले तरी जिल्ह्यात १ लाख ९१ हजार ७१५ हेक्टर क्षेत्रातच खरीपाची लागवड केली जाते. त्यामुळे खरीपासाठी कृषी विभागाने ६२ हजार ८४४ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २ लाख ८६ हजार ७५ कुटुंबांचा उदरनिर्वाह शेतीवर चालतो.
यंदा खरीप हंगामासाठी बियाणांची मागणी करण्यात आली. त्यात भाताचे वाण मागविताना महाबीज कडून ३० हजार क्विंटल तर खासगी कंपन्यांकडून ३२ हजार ५४० क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली आहे.
तूर महाबीज कडून १०० क्विंटल तर खासगी कंपन्यांकडून ८६ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली. मूंग महाबीज कडून १ क्विंटल तर खासगी कंपन्यांकडून १ क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली. उडीद महाबीज कडून १ क्विंटल तर खासगी कंपन्यांकडून १ क्विंटल, ढेंचा महाबीज कडून ५३ क्विंटल तर खासगी कंपन्यांकडून ५३ क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली आहे.

बियाणे खरेदी करताना ही काळजी घ्या
बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाºया अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदीस प्राधान्य द्यावे. बनावट व भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्यांकडून पावतीसह खरेदी करा, पावतीवर बियाण्याचा संपूर्ण तपशिल जसे पीक, वाण, संपूर्ण लॉट नंबर बियाणे कंपनीचे नाव, किंमत, खरेरीदाराचे संपूर्ण नाव व पत्ता, विक्रेत्यांचे नाव इत्यादी नमूद करावे. रोख किंवा उधारीची पावती घ्यावी. खरेदी केलेल्या बियाण्यांचे वेश्टन-पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. खरेदी केलेले बियाणे त्या हंगामासाठी शिफारस केल्याची खात्री करावी. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाण्यांंची पाकीटे सिलबंद व मोहोरबंद असल्याची खात्री करा. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकीटवरची अंतीम मुदत पाहून घ्यावी.

७१ हजार मेट्रिक टन खताची मागणी
सन २०१९-२० मधील खरीप हंगामासाठी कृषी विभागाने ७१ हजार ५५ मेट्रीक टन खताची मागणी शासनाकडे केली आहे. त्यात युरीया ३३ हजार २०० मेट्रीक टन, डीएपी ३ हजार ३०० मेट्रिक टन, एमओपी ७२५ मेट्रिक टन, एसएसपी १३ हजार ५०० मेट्रिक टन, संयुक्त खते १५ हजार ३३० मेट्रिक टन तर मिश्र खते ५ हजार मेट्रिक टनची मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्याकडे मागील वर्षीचा ३ हजार ३९८ मेट्रीक टन युरिया, २०६.२ डीएपी, १२०.१ एमओपी, ३ हजार १०९.९२ एसएसपी, २ हजार ७७०.८ संयुक्त खते, १ हजार ३१.०१ मिश्र खते असे एकूण १० हजार ६३६ मेट्रिक टन खत शिल्लक आहेत.

भेसळीची शंका दूर करण्यासाठी खतांची पाकीटे व गोणी सिलबंद मोहोरबंद असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. कमी वजनाच्या निविष्ठा छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री होत असतील तर जवळच्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.
-महेंद्र मडामे
मोहिम अधिकारी, जि.प.गोंदिया

Web Title: 63 thousand quintals of seed for Kharif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.