६३ धान खरेदी केंद्रांना मान्यता
By Admin | Updated: May 18, 2016 01:58 IST2016-05-18T01:58:54+5:302016-05-18T01:58:54+5:30
किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेअंतर्गत २०१५-१६ च्या रबी हंगामासाठी धानाच्या आधारभूत किमती जाहीर करण्यात आल्या आहे.

६३ धान खरेदी केंद्रांना मान्यता
गोंदिया : किमान आधारभूत किंमत धान खरेदी योजनेअंतर्गत २०१५-१६ च्या रबी हंगामासाठी धानाच्या आधारभूत किमती जाहीर करण्यात आल्या आहे. आधारभूत किमतीचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होण्याच्या दृष्टीने व शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किमतीचे धान विकण्याची वेळ येऊ नये म्हणून जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या ४१ आणि आदिवासी क्षेत्रात आदीवासी विकास महामंडळाकडून २२ अशा एकूण ६३ धान खरेदी केंद्रांना जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी मंजुरी दिली आहे.
जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांचेमार्फत खरेदी होणाऱ्या ४१ केंद्राची यादी तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. गोंदिया तालुका- कटंगीकला, रावणवाडी, काटी, दासगाव, अदासी, कामठा, मिजतपूर, टेमणी, कोचेवाही, नवेगाव/धापेवाडा, आसोली. गोरेगाव तालुका- गोरेगाव, दवडीपार, मोहगाव/तिल्ली, कुऱ्हाडी, तेढा. अर्जुनी/मोरगाव तालुका- अर्जुनी मोरगाव (वि.का.), अर्जुनी मोरगाव (रा.मि.) अर्जुनी मोरगाव (ख.वि.), नवेगावबांध, भिवखिडकी. आमगाव तालुका- आमगाव, गोरठा. सालेकसा तालुका- सालेकसा (रा.मि.). तिरोडा तालुका- पांजरा, चिरेखनी, तिरोडा, नवेझरी, विहिरगाव, मुंडीकोटा, चिखली, बघोली, भिवापूर, ठाणेगाव, मेंढा. सडक अर्जुनी तालुका- सौंदड, पांढरी, ब्राम्हणी, मुरपार, हेटी, धानोरी. तर आदिवासी विकास महामंडळ यांचेमार्फत खालील धान खरेदी केंद्रावर उन्हाळी धानाची खरेदी होणार आहे.
आदिवासी क्षेत्रात देवरी तालुका- डवकी, पुराडा, लोहारा/दे., अंभोरा, चिचेवाडा, चिचगड, सावली. सालेकसा तालुका- सालेकसा, बिजेपार, साकरीटोला, मक्काटोला, पिपरीया. अर्जुनी मोरगाव तालुका- गोठणगाव, केशोरी, इळदा, बाराभाटी, धाबे/पवनी, पांढरवाणी. सडक अर्जुनी तालुका- केनरी, चिखली, खजरी, डोंगरगाव अशा एकूण ६३ धान खरेदी केंद्रांना मंजूरी देण्यात आली आहे.
या सर्व धान खरेदी केंद्रावर साधारण धान १४१० रुपये प्रतीक्विंटल तर ‘अ’ दर्जाच्या धानाकरीता १४५० रु पये प्रतीक्विंटल, अधिक २०० रु पये प्रोत्साहनपर अनुदान असे दर निश्चित करण्यात आले आहेत. धान खरेदी केंद्रावर केवळ एफ.ए.क्यू. दर्जाच्या धानाची खरेदी करण्यात येणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
अटी ठरणार अडचणींच्या
उन्हाळी धानाच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांनी सातबारा उतारा सोबत आणायचा आहे. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळी धानाची लागवड या हंगामात केली आहे अशाच शेतकऱ्यांचा धान खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी उन्हाळी धानाची लागवड केल्याचे तलाठी किंवा कृषी अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, तसेच शेतकऱ्याने स्वत:चे ओळखपत्र सोबत आणायचे आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी ए.के. सवाई यांनी कळविले. मात्र ज्या शेतकऱ्यांनी विंधन विहिरीच्या पाण्यावर उन्हाळी धानाची लागवड केली त्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांकडे नाही. त्यामुळे त्या शेतकऱ्यांची अडचण होणार आहे. याशिवाय एकरी १५ क्विंटल धान खरेदी केला जाणार आहे. काही शेतकऱ्यांना यापेक्षा जास्त धान झाला असल्याने त्यांचीही अडचण होणार आहे.