शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियातील आयसोलेशन कक्षात ६१ जण दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 05:00 IST

तामिळनाडू येथील एक ट्रक चालक गोंदिया सामान सोडण्यासाठी आला होता. तो येथून परत गेल्यानंतर तामिळनाडू येथे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने गोंदिया येथे त्याच्या संपर्कात आलेल्या १० जणांना रविवारी (दि.१०) आयसोलेशन कक्षात दाखल केले. त्यामुळे सध्या एकूण ६१ जणावर आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहे.

ठळक मुद्दे३०९ जणांचे स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह : ४८ जण शासकीय क्वारंटाईन कक्षात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यातील गर्रा येथील एक युवक छत्तीसगड राज्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने गर्रा येथील युवकाचे कुटुंबीय आणि त्याच्या संपर्कात आलेल्या ३४ जणांना शासकीय क्वारंटाईन कक्षात दाखल करुन त्यांचे स्वॅब नमुने घेवून तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. यासर्व ३४ जणांचे नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर तामिळनाडू येथील एक ट्रक चालक गोंदिया सामान सोडण्यासाठी आला होता. तो येथून परत गेल्यानंतर तामिळनाडू येथे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने गोंदिया येथे त्याच्या संपर्कात आलेल्या १० जणांना रविवारी (दि.१०) आयसोलेशन कक्षात दाखल केले. त्यामुळे सध्या एकूण ६१ जणावर आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहे.तामिळनाडू येथील एक ट्रक चालक काही सामान सोडण्यासाठी पाच सहा दिवसांपूर्वी गोंदिया येथे आला होता. यानंतर सामान सोडून तामिळनाडूला परतला.तिथे परतल्यानंतर त्याची आरोग्य तपासणी केला असता तो कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याचे तेथील पोलीस अधीक्षकांनी गोंदिया पोलिसांना कळविले. त्यामुळे त्या चालकाच्या संपर्कात आलेल्या एकूण १० जणांना खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा क्रीडा संकुलातील आयसोलेशन कक्षात रविवारी (दि.१०) दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी दिली.या सर्व १० जणांचे स्वॅब नमुने नागपूर येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तर येथील आयसोलेशन कक्षात ५१ जणांना यापूर्वीच दाखल करण्यात आले. त्यामुळे सध्या एकूण ६१ जणांवर आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहे. तर जिल्ह्यातील सात शासकीय क्वारंटाईन कक्षात एकूण ४८ जणांवर उपचार सुरू आहे. यात एम.एस.आयुर्वेदिक कॉलेज कुडवा गोंदिया १७, चांदोरी ७, लिटिल बर्ड कॉन्व्हेंट, नगर परिषद तिरोडा ४, समाज कल्याण निवासी शाळा, डव्वा २, शासकीय आश्रमशाळा इळदा १३ आणि बिरसी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे ७ अशा एकूण ४८ व्यक्ती उपचार घेत आहेत.विशेष म्हणजे मागील ३० दिवसात जिल्ह्यात एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही.१९ जणांच्या स्वॅब नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षाकोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील एकूण ३२८ जणांचे स्वॅब नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी ३०९ जणांच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून हे सर्व नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर १९ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या