तीन दिवसांत ५७ धान खरेदी केंद्र सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 21:08 IST2017-10-09T21:08:18+5:302017-10-09T21:08:30+5:30
हलक्या पध्दतीचा धान कापणीवर आला आहे. काही ठिकाणी कापणी सुरू झाली आहे.

तीन दिवसांत ५७ धान खरेदी केंद्र सुरू होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : हलक्या पध्दतीचा धान कापणीवर आला आहे. काही ठिकाणी कापणी सुरू झाली आहे. शेतकºयांचा धान बाजारात येणार यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने तीन दिवसात ५७ धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले आहे.
७ आॅक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा मार्केटिंग अधिकारी अतूल नेरकर व आदिवासी विकास महामंडळाचे राजूरकर यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली. सभेत धान खरेदीवर चर्चा करण्यात आली. या सभेला इतर अधिकारी, खरेदी केंद्राचे संचालक उपस्थित होते. चर्चेदरम्यान धान खरेदीची प्रक्रिया लवकर सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.
या संबधी जिल्हा मार्केटिंग अधिकारी अतूल नेरकर यांनी तीन दिवसात ५७ धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश विविध संस्थांना दिले आहे. या आदेशानुसार येत्या तीन दिवसात धान खरेदीची प्रक्रिया सुरू होणार आहे. यंदा धानाचे पिक पावसाअभावी उशीरा निघत असल्याने शेतकºयांना आता धान खरेदीकेंद्र वेळेवर सुरू होत असल्याचे वाटत आहे.
आदिवासी क्षेत्रात १० केंद्र
आदिवासी विकास विभागाच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार सद्या आदिवासी भागात १० केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजूरी मिळताच धान खरेदी केंद्र सुरू केले जाणार आहे. राजूरकर यांच्या मते मागील वर्षी जिल्ह्यात ४३ धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. यावर्षी सुध्दा एवढेच केंद्र आदिवासी विभागामार्फत सुरू केले जाणार आहेत. दरवर्षी धान खरेदी केंद्र उशीरा सुरू केले जात असल्यामुळे शेतकºयांना नाईलाजास्तव आपले धान व्यापाºयांना विकावे लागते. परंतु यंदा पावसाने दडी मारल्यामुळे फक्त काहीच शेतकºयांचे धान कापणीवर आले आहेत. आता मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू झाल्याने भारी धानाला या पावसाचा फायदा आहे. परंतु धानाला मावा या रोगाने ग्रासल्याचे लक्षात आले आहे.
पाऊस झाला वैरी
शेतकºयांचे जीवनात आनंद फुलविणारा पाऊस वैरी झाला आहे. यावर्षी पावलोपावली पावसाची गरज असताना पाऊस आला नाही. आतापर्यंत जिल्ह्यातील तलाव, धरणे, विहीरी कोरड्या आहेत. हलके धान आता कापणीवर येत असताना मागील दोन दिवसापासून पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणच्या धानाला फायदा आहे तर कापणी झालेल्या धानाला नुकसान आहे.