शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

५० रुपयात करा वाहन प्रदूषणमुक्त!

By admin | Updated: January 31, 2015 01:47 IST

आपल्याकडील वाहन धूर फेकत आहे? वाहनात रॉकेलचा वापर करता म्हणून ते प्रदूषण पसरवीत आहे? एवढेच काय, पण आपल्याकडील वाहन भंगारमध्ये पडून आहे?

मनोज ताजने गोंदियाआपल्याकडील वाहन धूर फेकत आहे? वाहनात रॉकेलचा वापर करता म्हणून ते प्रदूषण पसरवीत आहे? एवढेच काय, पण आपल्याकडील वाहन भंगारमध्ये पडून आहे? नो प्रॉब्लम, आपले वाहन रस्त्यावरून चालताना अजिबात प्रदूषण पसरवित नाही, असे प्रमाणपत्र आपल्याला सहज मिळू शकते. वाहतूक अधिनियमानुसार प्रत्येक वाहनासाठी आवश्यक असणारे हे प्रमाणपत्र हवे असेल तर गोंदियात या, अवघे ५० रुपये द्या, आणि आपले वाहन प्रदूषणमुक्त करून जा.विश्वास बसणार नाही, पण प्रदूषणमुक्तीचा हा खेळखंडोबा सध्या गोंदियात बिनदिक्कतपणे सुरू आहे. अवघ्या ५० रुपयात येथील खासगी ‘पीयूसी सेंटर’ वर आपल्याला हमखास हे प्रदूषणमुक्तीचे प्रमाणपत्र (स्टिकर) मिळते. ‘लोकमत’ने केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये हा प्रकार चव्हाट्यावर आला.रस्त्यावरून धावणाऱ्या प्रत्येक वाहनाला दर सहा महिन्यातून एक वेळ वाहन प्रदुषणमुक्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र (पीयुसी) घेणे आवश्यक आहे. आपल्या वाहनाला हे पीयुसी स्टिकर नसेल तर वाहतूक नियंत्रक किंवा परिवहन अधिकारी आपल्या वाहनावर दंडात्मक कारवाई करू शकतात. त्यामुळे पीयुसी स्टिकर देणारी काही खासगी दुकानेच गोंदियात थाटण्यात आली आहेत. परिवहन विभागाकडून त्यांना अधिकृत परवानगी असली तरी प्रत्यक्षात कोणत्याही वाहनाची प्रत्यक्ष तपासणी न करताच नियमबाह्यपद्धतीने केवळ कागदोपत्री प्रदुषणमुक्ती दाखविण्याचा हा प्रकार कितपत योग्य? असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रादेशिक परिवहन विभागाचा या पीयूसी केंद्रांवर कोणताच अंकुश नसल्याची बाब स्पष्ट झाली आहे. ‘लोकमत’ने शहरातील परिवहन विभागाच्या (आरटीओ) कार्यालयासमोर असलेल्या आणि जयस्तंभ चौकात असलेल्या पीयूसी केंद्रावरून दोन वाहनांच्या पीयूसी स्लिप घेतल्या. मात्र कोणीही प्रत्यक्ष तपासणी करण्यासाठी वाहन दाखविण्याचा आग्रह केला नाही. अशाच पद्धतीने वाहनांना ‘प्रदुषणविरहित वाहन’ असे प्रमाणपत्र मिळत असेल तर पीयूसी तपासणीचा उद्देश किती सफल होणार? जि.प.चे भंगार वाहनही प्रदूषणमुक्तगोंदिया जिल्हा परिषदेच्या मागील बाजूूने अनेक भंगार वाहने एका रांगेत उभी आहेत. शहरातील जयस्तंभ चौकातील केंद्रात पीयूसी प्रमाणपत्र घेण्यासाठी गेल्यानंतर तेथे उपस्थित व्यक्तीला जिल्हा परिषदेच्या भंगार वाहनातील चेपलेल्या ‘एमएच ३५, डी २९५’ या टाटा सुमो जीपचा क्रमांक सांगून पीयूसी प्रमाणपत्र मागितले. त्याने कोणतीही चौकशी न करताना थेट वाहन प्रदूषणमुक्त असल्याचे स्टिकर बनवून दिले. त्याच्या हातात ५० रुपये ठेवून हे स्टिकर घेण्यात आले.