शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जिल्ह्यातील ४२८ हातपंप सौर उर्जेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 23:34 IST

प्रत्येक नागरिकाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे शासन अनेक योजना अंमलात आणत आहे. ग्रामीण भागातील जनताही शुद्ध पाण्यापासून वंचीत राहू नये यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंमलात आणले. ५० टक्के राज्य व ५० टक्के केंद्र शासन निधी देऊन उभारण्यात येणाऱ्या या योजनांतून हातपंप सौर उर्जेवर चालविले जात आहेत.

ठळक मुद्देराष्ट्रीय ग्रामीण पेयजल : मुदत संपलेल्यांच्या दुरुस्तीसाठी करावी उपाययोजना

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्रत्येक नागरिकाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे शासन अनेक योजना अंमलात आणत आहे. ग्रामीण भागातील जनताही शुद्ध पाण्यापासून वंचीत राहू नये यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंमलात आणले. ५० टक्के राज्य व ५० टक्के केंद्र शासन निधी देऊन उभारण्यात येणाऱ्या या योजनांतून हातपंप सौर उर्जेवर चालविले जात आहेत. गोंदिया जिल्ह्यातील ४२८ हातपंप सौरउर्जेवर चालत असून नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करीत आहेत.सरकारने गोंदिया, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी सुरू केलेली राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना सौर उर्जेवर चालविण्यात येत आहे. ज्याठिकाणी मुबलक प्रमाणात पाणी आहे असे संकेत भूजल सर्वेक्षण यंत्रणेने दिलेत त्या ठिकाणी सौरउर्जेवर चालणारे हातपंप बसविण्यात येते. अस्तीत्वात असलेल्या हातपंपावर सौरउर्जेची टेस्टींग करून संपूर्ण सीस्टम बसविण्यात येते. या सौर उर्जेच्या माध्यमातून प्रती तास २८ लीटर पाणी उपसा करू शकते अशा क्षमतेचे हे सौरउर्जेचे सेट बसविण्यात येते. या उपक्रमांतर्गत हा सौरउर्जेचा सेट बसविल्यानंतर पाच वर्षात त्यात बिघाड आला किंवा काही नुकसान झाले तर त्याच्या दुरूस्तीची जबाबदारी हा प्रोजेक्ट लावणाऱ्या कंपनीवरच असते.परंतु पाच वर्षाचा कालावधी लोटला तर त्या कंपनीचा कंत्राट संपतो व नंतर त्याच्या देखरेखीसाठी शासनाने कसलीही उपया योजना केली नाही. पाच वर्षानंतर पाईप लिकेज झालेत, सौर उर्जेचे प्लेट फुटले, किंवा लोक आपल्या गायी म्हशी स्टॅण्ड पोस्टला बांधत असल्याने ते स्टॅण्ड उखडले तर त्याच्या दुरूस्तीसाठी शासनाकडे तरतूद नाही. परिणामी एका हातपंपावर पाच लाख रूपये खर्च करून ते वाया जाते. पाच वर्षानंतरची देखभाल दुरूस्तीसाठी शासनाने उपयायोजना करून यांत्रीकी विभागाकडे त्या पद्धतीची सोय करणे अपेक्षीत आहे.विजेची बचत करीत ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी देणे या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून सहज शक्य होते. सन २०११-१२ पासून गोंदिया जिल्ह्यात सौरउर्जेवर चालणारे हातपंप उभारण्यात आले. पहिल्याच वर्षी २०० हातपंप सौरउर्जेवर चालविण्यात आले. सन २०१२-१३ या वर्षात ५० हातपंप, २०१४-१५ मध्ये ३८, २०१५-१६ मध्ये ३०, सन २०१६-१७ मध्ये ८५ व सन २०१७-१८ च्या ११८ पैकी २५ हातपंपांवर सौरउर्जेचे सेट बसविण्यात आले. या हातपंपांतून नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत आहे.सहा कोटींची गरजएका हातपंपाला सौरउर्जेचा सेट बसविण्यासाठी पाच लाख रूपये खर्च येतो. सन २०१७-१८ या वर्षात ११८ हातपंपावर सारउर्जेचे सेट बसवायचे होते. यापैकी २५ हातपंपांवर सेट बसविण्यात आले. उर्वरीत ९३ हातपंपावर सौरउर्जेचे पॅनल बसविण्यासाठी सहा कोटी रूपयांच्या निधीची गरज आहे. शासनाने निधी न दिल्यामुळे हे सेट बसविण्यात आले नाही.नागरिकांनीही घ्यावी काळजीराष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत गावात हातपंपावर सौरउर्जेची सोय झाली तर त्या योजनेतून आपल्याला पाणी मिळते व याची काळजी नागरिकांनीही घ्यायला हवी. जनावरांमुळे पाईप लिकेज होणे, वादळ वाºयामुळे किंवा लहान मुलांच्या दगड मारण्यामुळे सौर उर्जेचे प्लेट फुटणे, लोक आपल्या गायी, म्हशी स्टॅण्ड पोस्टला बांधत असल्याने ते स्टॅण्ड उखडतात ते होऊ नये यासाठी त्याच गावातील लोकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल या उद्देशाने या राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमातून हातपंपावर सौरउर्जेची सोय करण्यात येते. एकदा बांधकाम झाले तर पाच वर्ष देखभाल दुरूस्ती कंत्राटदाराकडे असते. त्यानंतर त्या योजनेच्या देखभाल दुरूस्तीसाठी नियोजन व्हावे, यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविला आहे.- नरेंद्र वानखेडे, उपअभियंता यांत्रीकी जि.प. गोंदिया.

टॅग्स :Waterपाणी