४१ हजार शेतकरी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 23:19 IST2019-05-11T23:19:04+5:302019-05-11T23:19:23+5:30
जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त ९ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दुष्काळनिधी अपुरा पडल्याने जिल्ह्यातील ४१ हजार शेतकरी मदतीला मुकले. ५०६ वंचित गावांतील शेतकऱ्यांसाठी आता १६ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी लागणार आहे. या वाढीव निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने आयुक्तांकडे केली आहे.

४१ हजार शेतकरी वंचित
रूपेश उत्तरवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त ९ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दुष्काळनिधी अपुरा पडल्याने जिल्ह्यातील ४१ हजार शेतकरी मदतीला मुकले. ५०६ वंचित गावांतील शेतकऱ्यांसाठी आता १६ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी लागणार आहे. या वाढीव निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने आयुक्तांकडे केली आहे.
संपूर्ण जिल्ह्याची आणेवारी ५० पैशांच्या आत असली, तरी जिल्ह्यातील ९ तालुकेच दुष्काळी मदतीस पात्र ठरले. यामध्ये यवतमाळ, बाभूळगाव, कळंब, केळापूर, राळेगाव, मारेगाव, दारव्हा, उमरखेड आणि महागाव तालुक्यांचा समावेश आहे. या ९ तालुक्यांसाठी आतापर्यंत २३२ कोटी रूपयांची दुष्काळी मदत राज्य शासनाने जिल्ह्याकडे वळती केली. आचारसंहितेपूर्वी ही मदत जिल्ह्यातील शेतकºयांच्या खात्यात वळती करण्यात आली. मात्र अनेक शेतकºयांना हा निधी मिळाला नसल्याची गंभीर बाब पुढे आली. निधी अपुरा पडल्याने अनेक शेतकºयांच्या खात्यात ही रक्कम पोहोचलीच नाही. आजही अनेक शेतकरी बँकांच्या येरझारा मारत आहेत. निधी जमा झालाच नाही म्हणून हे शेतकरी रिकाम्या हाताने परतत आहे. मात्र त्यांना निधी का मिळाला नाही, याची माहिती शासकीय यंत्रणेकडून दिली जात नाही.
५०६ गावांतील ४१ हजार ९७८ शेतकºयांच्या खात्यात निधी पोहोचला नाही. त्यांचा अहवाल प्रशासनाने तयार करून आयुक्तांकडे पाठविला आहे. वाढीव निधीची प्रतीक्षा आहे.