४१ जनावरांची मुक्तता करुन रोवली मुहूर्तमेढ
By Admin | Updated: August 8, 2015 02:04 IST2015-08-08T02:04:30+5:302015-08-08T02:04:30+5:30
येथील तालुका बजरंग दल कार्यालयाच्या वतीने गोवंश वाचवा मोहिमेची सुरुवात करण्यात आली. ४१ जनावरांची मुक्तता करून गोवंश बचाव मोहिमेला सुरूवात केली आहे.

४१ जनावरांची मुक्तता करुन रोवली मुहूर्तमेढ
गोवंश वाचवा : बजरंग दलाची मोहीम सुरू
आमगाव : येथील तालुका बजरंग दल कार्यालयाच्या वतीने गोवंश वाचवा मोहिमेची सुरुवात करण्यात आली. ४१ जनावरांची मुक्तता करून गोवंश बचाव मोहिमेला सुरूवात केली आहे.
आमगाव तालुका बजरंग दलाच्या वतीने गोहत्या गोवंश सरंक्षण, संगोपण, शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि कत्तलखान्यात गुऱ्हे पाठविण्यास मज्जाव करणे व समजूत घालणे इतर महत्वाच्या विषयांवरील मोहिमेला प्रारंभ करण्यात आला.
देशात गोहत्या बंदी संबंधीत नवीन कायदे कठोर करण्यात आले. जेणेकरुन शेतकऱ्यांचा जोडधंदा सुरक्षित राहावे पण प्रत्यक्षात कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याचे बालाराम व्यास म्हणाले.
सदर उपक्रमांची मुहूर्तमेढ सालेकसा रोडीवरील असून ट्रक क्रमांक एमएच ५३/के११०५ या वाहणात ५ गोरे व २१ बैल, ट्रक क्र.एमएच ५४/एबी५१२२ मध्ये ९ रेडे, ६ म्हशी भरुन कत्तलखान्यात जाणाऱ्या वाहनांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
आमगाव पोलीसांकडून गैरमार्गाने होत असलेल्या धंद्यावर स्वत:हुन कारवाई केल्याचे कधीच आढळून आले नाही. या प्रकरणी व इतर बाबींची माहिती वारंवार नागरिकांना घ्यावी लागते. सदर धंद्याची माहिती पोलिसांना असते. परंतु त्यांच्यावर कारवाई होत नाही.
या गंभीर विषयांवर नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरिक्षक काय करवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
या मोहीमेत बजरंग दलाचे तालुका प्रमुख बालाराम व्यास, प्रात सहसंयोजक नवीन जैन, विकास शर्मा, बंटी शर्मा, राजू बावणथडे, तुलसी फुंडे, राजू फुंडे, रामू मुनेश्वर, राजू कावडे, शुभम गुप्ता, श्याम चौव्हाण, हरिव्यास अभिषेक असाटी, हिरा ब्राह्मणकर, प्रमोद बोहरे, शंकर रोडे, विजय रगडे, संजय मते, छोटू हत्तीमारे यांचा समावेश आहे.
मोकाट कुत्र्यांचा हैदोस, नागरिक त्रस्त
गोंदिया : शहरातील फुलचूर्र नाका परिसरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे. यामुळे वाहनाच्या अपघातच्या घटना घडत आहेत. बेवारस कुत्र्यांमुळे नागरिकही त्रस्त झाले आहेत. पालिकेने या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.