‘तिबेट बचाव’साठी चार हजार किमीचा सायकल प्रवास
By Admin | Updated: January 24, 2015 01:20 IST2015-01-24T01:20:53+5:302015-01-24T01:20:53+5:30
तब्बल ४४ दिवस, पाच राज्ये आणि ४ हजार किमीचा प्रवास करून विश्वशांतीचा संदेश देणारे शांतीदूतांचे शुक्रवारी अर्जुनी-मोरगावच्या तिबेट वसाहतीत आगमन झाले.

‘तिबेट बचाव’साठी चार हजार किमीचा सायकल प्रवास
अर्जुनी-मोरगाव : तब्बल ४४ दिवस, पाच राज्ये आणि ४ हजार किमीचा प्रवास करून विश्वशांतीचा संदेश देणारे शांतीदूतांचे शुक्रवारी अर्जुनी-मोरगावच्या तिबेट वसाहतीत आगमन झाले. या चमूचे साई मंदिरात विविध संघटनातर्फे स्वागत करण्यात आले. जागतिक मानवाधिकार दिवस तसेच विश्व शांतीदूत दलाई लामा यांच्या नोबल शांती पुरस्कार रजत महोत्सव वर्ष निमित्ताने भारत-तिबेट मैत्री संघ नागपूरच्या वतीने ‘तिबेट बचाव सायकल यात्रा’ काढली होती. या यात्रेचा नार्गेलिंग तिबेट वसाहत गोठणगाव येथे शुक्रवारी समारोप झाला.
तिबेटमध्ये शांतीदूत दलाई लामा यांचे परत जाणे हा तिबेट लढ्यासाठी संघर्ष करणाऱ्या शहिदांचा मुख्य उद्देश होता. तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी या माध्यमातून चीनवर दबाव निर्माण करावा, चीनच्या विविध कारागृहात यातना भोगणारे ११ वे पंचम लामा गोदून छोक्की निम्मा, टिल्कू तेन्झिन डेलके व इतर कैद्यांना तातडीने सुटका करावी, तिबेटची वास्तविकता जाणून घेण्यासाठी स्वतंत्ररित्या आंतरराष्ट्रीय पत्रकार तसेच इतर आंतरराष्ट्रीय युवक संघटनांचे प्रतिनिधी मंडळ पाठविणे, चीनने तिबेटमध्ये होत असलेल्या मानवाधिकाराच्या उल्लंघनावर प्रतिबंध घालणे, भारत-तिबेट सीमा तसेच संपूर्ण पूर्व-उत्तर सीमांवर परमाणू प्रक्षेपणास्त्राच्या वाढत्या हस्तक्षेपांवर बंदी घालणे, चिनने ताब्यात घेतलेली भारताची ४० हजार वर्ग मिल जमीन परत करावी, तसेच भारतातील अरूणाचल प्रदेश व सिक्कीम राज्यावर चीनच्या दावेदारीला गांभीर्याने घ्यावे, कैलास मानसरोवरला चीन सेनेच्या कब्ज्यातून मुक्त करावे, तसेच दलाई लामा यांना भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करावे हा या सायकल भ्रमण प्रवासाचा मुख्य उद्देश आहे. या सर्व बाबींना लक्षात घेऊन भारत सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करून चीनच्या विस्तारवादी व दबावतंत्राचा तिबेटीयनांनी निषेध व्यक्त केला.
या दलाचे साई मंदीर येथे अशोक चांडक, मुकेश जायस्वाल, अशोक काळबांधे, शालीकराम हातझाडे, परसराम शेंडे, नविन नशिने, राजू पालीवाल, सुनिल लंजे व प्रशांत अवचटे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी संदेश मेश्राम, कालसंग छोडक, ओर्गेन नॉर्बू, तेन्जिन थोरडो, त्सेवांग, दोरजी ठोकरे, तेन्जी त्सोग्याल, वॉगचेन, सामतेन लोपसांग, तेन्जिन कुंगा, लोपसांग दावा, चिमे रिनझीन, तेन्जीन ल्हाग्याल, फुन्त्सोक तोशी, दोरजी सरपंच, त्सेवांग वांगमो, तेन्जीन यान्डोन, न्गोडूप ल्हामो, तेन्जीन चीमे, तेन्जीन टिन्पो, फुन्त्सोक टोपस्याल, त्सेवांग वांगचूक, तेन्जिन नान्ग्याल और तेन्जीन जिन्पा उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)