शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात पकडले ३८ विद्युत चोर

By admin | Updated: April 4, 2015 01:12 IST

१६ लाख ७९ हजारांचा दंड वसूल$$्निेगोंदिया : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीद्वारे आर्थिक वर्ष १ एप्रिल

गोंदिया शहर : १६ लाख ७९ हजारांचा दंड वसूल$$्निेगोंदिया : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीद्वारे आर्थिक वर्ष १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ पर्यंत गोंदिया शहरात वीज चोरीची ३८ प्रकरणे उघडकीस आणण्यात आलीत. या वीज चोरांकडून महावितरणने १६ लाख ७९ हजार २१५ रूपयांचा दंड वसूल केला आहे.महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या गोंदिया विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अबदुस सलाम यांनी सांगितले की, शहरात विद्युत चोरीवर अंकुश लावण्याचे प्रयत्न करण्यात आले आहे. १२ महिन्यात जवळपास प्रतिमहिना तीन विद्युत चोऱ्या पकडण्यात यश आले आहे. या कारवायांमुळे चोऱ्यांवर नियंत्रण आले आहे.गोंदिया शहरातील विद्युत चोऱ्यांची पुष्टी करताना कार्यकारी अभियंता सलाम यांनी सांगितले की, संशयाच्या आधारावर वीज कंपनीचे कर्मचारी मीटरची तपासणी करतात. मीटर फॉल्टी आढळल्यावर विद्युत ग्राहकाकडून दीडपट दंडाची रक्कम वसूल करण्यास प्राधान्य दिले जाते. तसेच या वसुलीच्या रकमेत व्याजसुद्धा जोडले जाते. ग्राहकांची बदनामी होवू नये यासाठी पहिल्या वेळी सापडलेल्या वीज चोरांची तक्रार पोलिसांत केली जात नाही. परंतु तीच व्यक्ती जर दुसऱ्यांदा वीज चोरीच्या प्रकरणात सापडली तर विद्युत वितरण कंपनी त्याची तक्रार पोलिसात करण्यास मागेपुढे पाहात नाही. परंतु कंपनीद्वारे पोलिसांत तक्रार न करण्याच्या प्रकारामुळे चोरीच्या घटनांवर तेवढ्या प्रमाणात अंकुश लावणे कठीण असल्याचे बोलले जाते. पहिल्या वेळी विद्युत चोरांकडून केवळ दंडच वसूल करण्याची तरदूत असेल तर विद्युत चोरांचे धाडस आणखी वाढू शकेलविद्युत मीटरमध्ये सेंसर लावणे किंवा रिमोर्टद्वारे मीटरला छेडण्याच्या प्रकरणांत विद्युत ग्राहकाला रिमोर्ट कुठून मिळाला किंवा कोणत्या व्यक्तीद्वारे मीटरमध्ये सेंसर लावण्यात आले किंवा मीटरची गती कमी करण्यात आली, त्या व्यक्तीबाबत कसलीही चौकशी केली जात नाही. मीटरमध्ये तांत्रिक हेरफेर करणारे आरोपी जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत विद्युत कंपनी वीज चोरीवर अंकुश लावण्यात यशस्वी होणे कठिणच आहे. रिमोटद्वारे मीटरमध्ये बिघाड करून वीज चोरी करणारे आरोपी न पकडण्यामागे वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांवर शंका व्यक्त केली जाते. गोंदिया शहरात जरी उद्योग मीटरधारक अधिक नसले तरी पहिली चोरीची शिक्षा केवळ दंडनितीच्या स्वरूपाची असल्याने वीज वितरण कंपनीला नेहमीच आर्थिक नुकसान सहन करावे लागते.(प्रतिनिधी)कर्मचाऱ्यांची कमतरताअतिरिक्त कार्यकारी अभियंता अबदुस सलाम यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे अनेकदा पोलिसात तक्रार करणे कठिण जाते. सद्यस्थितीत विद्युत चोरीच्या प्रकरणांत पोलिसात तक्रार काटोल रोड पोलीस ठाणे, नागपूर येथे केली जाते. नागपूरला ये-जा करणे कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे शक्य होत नाही. तसेच पोलीस विविध दस्तावेजांच्या नावावर विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत चांगला व्यवहार करीत नाही. त्यामुळे आरोपीच्या विरूद्ध पोलिसांत तक्रार केली जात नाही.ग्राहकांची लूट, जागो ग्राहक जागोआतापर्यंत वीज वितरण कंपनीला वीज वितरणातून जी हानी होत होती, त्याची वसुली ग्राहकांच्या विद्युत बिलांच्या माध्यमातून केली जात होती. परंतु आता ही प्रणाली बंद करून एका नवीन नावाने ग्राहकांची लूट केली जात आहे. या नव्या प्रणालीचे नाव ‘ट्रान्समिशन जनरेशन डिस्ट्रिब्युशन अधिभार’ असे आहे. सदर अधिभार १.७२ पैसे प्रतियुनिटच्या दराने मागील एप्रिल ते मार्च २०१५ पर्यंत वसूल करावयाचा होता. या वसुलीची रक्कम ग्राहकांना परत करण्याची बाबही निर्णयात करण्यात आली होती. परंतु परत करणे तर दूर, हा अधिभार बंद करण्यात आल्याची कसलीही सूचना आतापर्यंत कार्यालयास प्राप्त झालेली नाही. त्यामुळे तो अधिभार पुढेसुद्धा सुरू राहील. यासाठीच ही वसुली सर्व ग्राहकांच्या मीटर बिलातून केली जात आहे. विद्युत चोरीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई विद्युत वितरण कंपनी या नवीन प्रणालीतून करीत आहे. यात प्रामाणिक ग्राहकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.