शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

सहा क्वारंटाईन कक्षात ३७ जणांवर उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 05:01 IST

जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण २२३ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने चाचणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यापैकी २०४ व्यक्तींच्या घशातील स्त्रावांच्या नमुन्यांचा चाचणी अहवाल जिल्हा आरोग्य विभाग व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाला आहे. यामध्ये २०४ स्वॅब नमुन्यांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर १९ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून अद्याप प्राप्त व्हायचा आहे.

ठळक मुद्दे२०४ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह : १९ दिवसांत नवीन रु ग्णाची नोंद नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने थोडी लक्षणे दिसताच अशा व्यक्तींना शासकीय क्वारंटाईन कक्षात दाखल करु न त्यांच्यावर उपचार सुरू केले जातात. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेवून ते नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. सद्यस्थितीत जिल्ह्यातील सहा शासकीय क्वारंटाईन कक्षात ३७ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण २२३ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने चाचणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यापैकी २०४ व्यक्तींच्या घशातील स्त्रावांच्या नमुन्यांचा चाचणी अहवाल जिल्हा आरोग्य विभाग व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाला आहे. यामध्ये २०४ स्वॅब नमुन्यांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर १९ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून अद्याप प्राप्त व्हायचा आहे.विशेष म्हणजे, जिल्ह्यात पुन्हा कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासनाकडून विशेष उपाययोजना केल्या जात आहे. त्यामुळेच मागील १९ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात कोरोना बाधीत एकही रु ग्ण आढळून आला नाही. ही जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे. जिल्हा यापुढेही कोरोनामुक्त ठेवण्यासाठी जिल्हावासीयांनी घरातच राहून शासन व प्रशासनाने दिलेल्या दिशा निर्देशांचे पालन करावे. अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडताना ‘सोशल डिस्टंसिंग’चे पालन करुन जिल्ह्याला कोरोनामुक्त ठेवण्यास मदत करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील सहा शासकीय क्वारंटाईन कक्षात एकूण ३७ व्यक्ती उपचार घेत आहेत. यामध्ये जिल्हा क्रीडा संकुल येथे १३, ग्राम चांदोरी ेयेथे १३, ग्राम येगाव येथे एक, तिरोडा येथील नगर परिषद लिटिल बर्ड कॉन्व्हेंट येथे तीन, ग्राम घटेगाव येथे चार आणि ग्राम बिरसी उपकेंद्र येथे तीन अशा एकूण ३७ व्यक्तींचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या