सहा क्वारंटाईन कक्षात ३७ जणांवर उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 05:01 IST2020-04-30T05:00:00+5:302020-04-30T05:01:00+5:30
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण २२३ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने चाचणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यापैकी २०४ व्यक्तींच्या घशातील स्त्रावांच्या नमुन्यांचा चाचणी अहवाल जिल्हा आरोग्य विभाग व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाला आहे. यामध्ये २०४ स्वॅब नमुन्यांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर १९ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून अद्याप प्राप्त व्हायचा आहे.

सहा क्वारंटाईन कक्षात ३७ जणांवर उपचार सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने थोडी लक्षणे दिसताच अशा व्यक्तींना शासकीय क्वारंटाईन कक्षात दाखल करु न त्यांच्यावर उपचार सुरू केले जातात. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेवून ते नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. सद्यस्थितीत जिल्ह्यातील सहा शासकीय क्वारंटाईन कक्षात ३७ जण उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण २२३ व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने चाचणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यापैकी २०४ व्यक्तींच्या घशातील स्त्रावांच्या नमुन्यांचा चाचणी अहवाल जिल्हा आरोग्य विभाग व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाला आहे. यामध्ये २०४ स्वॅब नमुन्यांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर १९ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून अद्याप प्राप्त व्हायचा आहे.
विशेष म्हणजे, जिल्ह्यात पुन्हा कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासनाकडून विशेष उपाययोजना केल्या जात आहे. त्यामुळेच मागील १९ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात कोरोना बाधीत एकही रु ग्ण आढळून आला नाही. ही जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे. जिल्हा यापुढेही कोरोनामुक्त ठेवण्यासाठी जिल्हावासीयांनी घरातच राहून शासन व प्रशासनाने दिलेल्या दिशा निर्देशांचे पालन करावे. अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडताना ‘सोशल डिस्टंसिंग’चे पालन करुन जिल्ह्याला कोरोनामुक्त ठेवण्यास मदत करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील सहा शासकीय क्वारंटाईन कक्षात एकूण ३७ व्यक्ती उपचार घेत आहेत. यामध्ये जिल्हा क्रीडा संकुल येथे १३, ग्राम चांदोरी ेयेथे १३, ग्राम येगाव येथे एक, तिरोडा येथील नगर परिषद लिटिल बर्ड कॉन्व्हेंट येथे तीन, ग्राम घटेगाव येथे चार आणि ग्राम बिरसी उपकेंद्र येथे तीन अशा एकूण ३७ व्यक्तींचा समावेश आहे.