शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

गोंदिया जिल्ह्यातील ३६ हजार शेतकऱ्यांचा सातबारा झाला कोरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 4:29 PM

राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत आत्तापर्यंत जिल्ह्यातील ३६ हजार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात आला आहे.

ठळक मुद्देशेकडो शेतकरी प्रतीक्षेत

आॅनलाईन लोकमतगोंदिया : राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत आत्तापर्यंत जिल्ह्यातील ३६ हजार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात आला आहे. त्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली. मात्र यानंतरही कर्जमाफीस पात्र ठरलेले शेकडो शेतकरी प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे.शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीस प्राथमिक यादीत सुरूवातीला जिल्ह्यातील ७६ हजार शेतकरी पात्र ठरले होते. चावडी वाचन आणि अर्जाच्या छाननीनंतर यातील मोठ्या प्रमाणावर अर्ज अपात्र ठरविण्यात आले. त्यानंतर हिवाळी अधिवेशनादरम्यान सरकारने जिल्ह्यातील ४६ हजार ६८७ शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरल्याचे जाहीर केले होते. यापैकी आत्तापर्यंत एकूण ३६ हजार ४७६ शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात आला. यामध्ये २३ हजार ६२७ थकीत कर्जदार व १२ हजार ८४९ नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. थकीत बाकीदार शेतकऱ्यांच्या खात्यावर ७७ कोटी ७० लाख रुपये व नियमित कजफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर १८ कोटी २६ लाख असे एकूण ९५ कोटी ९७ लाख रुपये जमा करण्यात आले. कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात जिल्हा मध्यवर्ती बँक आघाडीवर आहे. तर राष्टयकृत बँका फार माघारल्याचे चित्र आहे. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी अजूनही १० हजार शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांची बँकामध्ये पायपीट सुरूच असल्याचे चित्र आहे.त्या शेतकऱ्यांचे कायकर्जमाफीस पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील हजारावर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली होती. मात्र आधार क्रमांक जुळत नसल्याचे व त्रुट्या आढळल्याचे सांगत या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेली कर्जमाफीची रक्कम शासनाला परत पाठविण्यात आली. मात्र या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही. हे शासनाने अद्यापही स्पष्ट केलेले नाही त्यामुळे संभ्रम कायम आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी