जिल्ह्यात मलेरियाचे २७६ रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:26 IST2018-10-27T00:25:50+5:302018-10-27T00:26:36+5:30
जिल्ह्यात डेंग्यू पेक्षा मलेरिया जास्त पाय पसरत असल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत जिल्हा मलेरिया विभागाने तीन लाख २१ हजार २३४ रूग्णांची रक्ततपासणी केली असून त्यात २७६ रूग्ण मलेरिया ग्रस्त आढळून आले आहेत.

जिल्ह्यात मलेरियाचे २७६ रूग्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात डेंग्यू पेक्षा मलेरिया जास्त पाय पसरत असल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्यापर्यंत जिल्हा मलेरिया विभागाने तीन लाख २१ हजार २३४ रूग्णांची रक्ततपासणी केली असून त्यात २७६ रूग्ण मलेरिया ग्रस्त आढळून आले आहेत.
विशेष म्हणजे, सन २०१७ मध्ये तीन लाख ४३ हजार ८१४ रूग्णांची तपासणी केली असता त्यात ४४१ रूग्ण मलेरियाग्रस्त आढळून आले होते. डेंग्यूचे नाव घेताच थरकाप येणार अशी स्थिती आहे. मात्र जिल्ह्यात डेंग्यू पेक्षा मलेरियाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहे.
जिल्ह्यात मागील वर्षी सन २०१७ मध्ये जिल्हा मलेरिया विभागाने तीन लाख ४३ हजार ८१४ रूग्णांची रक्त तपासणी केली होती. त्यात ४४१ रूग्ण मलेरियाग्रस्त आढळून आले. तर यावर्षी सन २०१८ मध्ये तीन लाख २१ हजार २३४ रूग्णांची रक्त तपासणी केली असता त्यात २३४ रूग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात मलेरियाचे ७० रूग्ण आढळून आले होते.
मात्र यावर्षी फक्त १० रूग्ण आढळून आले आहेत. डेंग्यूबाबत मात्र मागील वर्षी फक्त एकच रूग्ण सप्टेंबर महिन्यापर्यंत आढळून आला होता. यंदा मात्र सप्टेंबर महिन्यापर्यंत दोन रूग्ण आढळून आले आहेत. हे दोन्ही रूग्ण कामानिमित्त बाहेर गेले होते व डेग्यूने ग्रस्त होऊन गावी परतून आले होते.
यापुर्वी डेंग्यू संदर्भात रूग्णाचे रक्त नमुने नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले होते. मात्र यंदा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ही सेवा उपलब्ध करविण्यात आली आहे.
फायलेरिया शोध मोहीम
यंदा १६ ते ३१ आॅगस्ट दरम्यान फायलेरिया शोध मोहीम राबविण्यात आली. यात आढळून आलेल्या रूग्णांची पुन्हा तपासणी केली जात आहे. यंदा फायलेरिया शोध मोहिमेची गुणवत्ता वाढविण्यात आली असून याच्या समूळ उपचार व शस्त्रक्रि येचा लाभ रूग्णांना उपलब्ध करवून दिला जात आहे. तर विविध उपाययोजनांच्या माध्यमातून स्क्रब टायफस रूग्णांची संख्याही कमी झाली आहे. नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवून पाणी साठू देऊ नये असे जिल्हा मलेरिया अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांनी केले आहे.