शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २०१ स्वॅब नमुने कोरोना निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 05:00 IST

जिल्ह्यात सद्या स्थितीत कोरोनाचा एकही रुग्ण नसून जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे पुन्हा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने थोडी लक्षणे दिसताच त्यांचे स्वॅब नमुने घेऊन ते तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले जात आहे. तर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासकीय क्वारंटाईन कक्षात दाखल करु न त्यांच्यावर उपचार केले जात आहे.

ठळक मुद्दे१९ नमुन्यांचा अहवाल अप्राप्त : ५१ जण शासकीय क्वारंटाईन कक्षात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील आतापर्यंत एकूण २२० जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी नागपूर मेयो येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यापैकी २०१ स्वॅब नमुन्यांचा अहवाल मंगळवारपर्यंत (दि.२८) जिल्हा आरोग्य विभाग व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाला आहे. यात २०१ नमुने कोरोना निगेटिव्ह आले असून १९ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे.जिल्ह्यात सद्या स्थितीत कोरोनाचा एकही रुग्ण नसून जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे पुन्हा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने थोडी लक्षणे दिसताच त्यांचे स्वॅब नमुने घेऊन ते तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले जात आहे. तर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासकीय क्वारंटाईन कक्षात दाखल करु न त्यांच्यावर उपचार केले जात आहे.जिल्ह्यातून आतापर्यंत एकूण २२० जणांचे स्वॅब नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यापैकी २०१ जणांच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून हे सर्व नमुने कोरोना निगेटिव्ह आल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.तर १९ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात आहे. त्यामुळेच जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यात मदत होत आहे.१८ दिवसांत नवीन रु ग्णाची नोंद नाहीजिल्ह्यात पहिला कोरोना बाधीत रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. तसेच दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे उपाययोजना राबविल्या. त्यामुळे कोरोनाच्या रु ग्णांच्या संख्येत वाढ झाली नाही. तर मागील १८ दिवसांत जिल्ह्यात एकही नवीन रु ग्ण आढळून आला नाही.सात शासकीय क्वारंटाईन कक्षात ५१ जणकोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने थोडीही लक्षणे दिसताच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्यांना शासकीय क्वारंटाईन कक्षात दाखल करु न त्यांचे स्वॅब नमुने घेवून उपचार केले जात आहे. यातंर्गत जिल्ह्यातील सात शासकीय क्वारंटाईन कक्षात ५१ जण उपचार घेत आहेत. यामध्ये जिल्हा क्र ीडा संकुल येथे २०, एम.एस आयुर्वेदिक कॉलेज येथे दोन, ग्राम चांदोरी येथे १८, ग्राम येगाव येथे एक, तिरोडा येथील नगर परिषद लिटिल बर्ड कॉन्व्हेंट मध्ये तीन, ग्राम घटेगाव येथे चार आणि ग्राम बिरसी उपकेंद्र येथे तीन अशा एकूण ५१ व्यक्तींचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या