गोंदिया जिल्ह्यात इनोव्हा-ट्रक अपघातात २ ठार ४ गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 14:51 IST2019-02-14T14:49:49+5:302019-02-14T14:51:12+5:30
जिल्ह्यातील देवरी पासून ८ किमी अंतरावरील मरामजोब घाटामध्ये इनोव्हा-ट्रकच्या भीषण अपघातात २ ठार ४ गंभीर झाल्याची घटना गुरुवारी दुपारी १ च्या सुमारास घडली.

गोंदिया जिल्ह्यात इनोव्हा-ट्रक अपघातात २ ठार ४ गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: जिल्ह्यातील देवरी पासून ८ किमी अंतरावरील मरामजोब घाटामध्ये इनोव्हा-ट्रकच्या भीषण अपघातात २ ठार ४ गंभीर झाल्याची घटना गुरुवारी दुपारी १ च्या सुमारास घडली. गोंदियावरून रायपूरकडे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरून इनोव्हा क्रमांक ३५ १६८८ भरधाव वेगात जात होती . हा घाट अपघात प्रवण असल्यामुळे इनोव्हा कारवरील चालकाचे नियंत्रण सुटून त्याने समोरून येणाऱ्या ट्रकला जबर धडक दिली. यामध्ये ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. या अपघातात यामध्ये रोशन ठकरानी (४५ ), मीरा ठकरांनी (६८) यांचा जागीच मृत्यू झाला असून सपना ठकरांनी (४०) चंचल ठकरांनी (१७) हर्ष ठकरांनी (१२) आणि इनोव्हा चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे. वृत्त लिहीत पर्यन्त देवरी पोलीस स्टेशनला गुन्हाची नोंद झालेली नाही.